‘प्रिय कुंती, तुझ्यामुळे आयुष्यातील एक तप सुखाचा गेला, असंच साथ देत पुढे जाऊ’, रोहित पवारांची पत्नीसाठी खास पोस्ट

'प्रिय कुंती, तुझ्यामुळे आयुष्यातील एक तप सुखाचा गेला, असंच साथ देत पुढे जाऊ', रोहित पवारांची पत्नीसाठी खास पोस्ट

आमदार रोहित पवार यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी त्यांच्या पत्नी कुंती पवार यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य केलंय. तसंच त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

आयेशा सय्यद

|

May 29, 2022 | 4:14 PM

मुंबई :  कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी त्यांच्या पत्नी कुंती पवार यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य केलंय. तसंच त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. खास फेसबुक पोस्ट लिहून रोहित पवार यांनी पत्नी कुंती (Kunti Pawar) यांचे आतापर्यंत खंबीरपणे साथ दिल्याबद्दल आभार मानलेत. तसंच पुढेही अशीच साथ देण्याचं वचन दिलं आहे. त्यांची ही फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

रोहित पवार यांच्या खास शुभेच्छा

रोहित पवार यांनी पत्नी कुंती यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दोघांचा खास फोटो शेअर करत हॅपी अॅनिव्हर्सरी, असं म्हटलंय. “प्रिय कुंती! happyanniversary! माझ्या आयुष्यात ज्या दोन महिलांचा प्रभाव आहे, त्यात आई आणि तू आहेस. तुझी साथ तर फार मोलाची आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात तू खंबीरपणे पाठीशी असतेस. उच्चशिक्षित असूनही स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून मुलं मोठी होईपर्यंत गृहिणी म्हणून काम करायचं तू ठरवलं. मी सार्वजनिक जीवनात असल्याने मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, म्हणून तू स्वतःहून हा निर्णय घेतलास. तो वरकरणी कितीही सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र किती अवघड आहे, याची मला जाणीव आहे. म्हणूनच माझ्या आयुष्यात तुझं स्थान नेहमीच खास आणि विशेष असं आहे आणि ते नेहमीच तसं राहील. आज आपल्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली. वैवाहिक आयुष्याच्या यशस्वी तपपूर्तीनिमित्त आणि पुढंही वर्षानुवर्षे एकमेकांची साथ अशीच कायम राहणार असल्याबद्दल Thank U कुंती!”, असं रोहित यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

रोहित आणि कुंती पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

रोहित पवार आणि कुंती पवार यांच्यावर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आणि रोहित पवार यांचे हितचिंतक त्यांना शुभेच्छा देत आहेत.

कोण आहेत कुंती पवार?

कुंती या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतिश मगर यांच्या कन्या आहेत. नॉटिंगहॅम विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि गुंतवणूक या विषयात त्यांनी पदवी संपादन केली आहे. रोहित-कुंती जोडीला दोन अपत्य आहेत. आनंदिता आणि शिवांश अशी त्यांची नावे आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें