भाजपच्या काळात सर्वाधिक बलात्कार, 66 बलात्कारी आरोपींना भाजपचं तिकीट : रुपाली चाकणकर

पाच वर्षात भाजपने 66 बलात्कारीत आरोपींना उमेदवारी दिल्याची टीका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

भाजपच्या काळात सर्वाधिक बलात्कार, 66 बलात्कारी आरोपींना भाजपचं तिकीट : रुपाली चाकणकर
Yuvraj Jadhav

|

Oct 10, 2020 | 3:54 PM

सोलापूर- गेल्या पाच वर्षात भाजपने 66 बलात्कारीत आरोपींना उमेदवारी दिल्याची टीका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. सर्वाधिक बलात्काराच्या घटना या भाजप सरकारच्या काळात झाल्याचा आरोप देखील चाकणकर यांनी केला आहे. (NCP Leader Rupali Chakankar criticize BJP at Solapur)

सर्वाधिक बलात्काराच्या घटना या नागपूर शहर आणि जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपूरचे देवेंद्र फडणवीस होते. भाजपने 66 बलात्कारी आरोपींना उमेदवारी दिल्याचा आरोप देखील चाकणकर यांनी केला आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार ज्या घटना घडल्या आहेत त्यातील सर्वाधिक घटना भाजप सरकारच्या काळातील आहेत. भाजपने 66 आरोपींना उमेदवारी दिल्या आहेत. तेच लोक पुढे निवडूण येतात विधानसबेत जातात, असं चाकणकर यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या वतीने सोलापुरात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीस आल्या असताना चाकणकर बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात महिला आघाडीची आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये एकाच हॉलमधे म्हणजे तब्बल 100 हून अधिक महिला दाटीवाटीने एकत्रित जमल्याचे चित्र बघायला मिळालं.

संबंधित बातम्या:

फडणवीस मुख्यमंत्री असताना ‘वर्षा’वर गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिलीय, रुपाली चाकणकरांचा घणाघात 

Hathras Case | योगीजी, उत्तर प्रदेशात आपल्याला रामराज्य आणायचंय की गुंडाराज?; रुपाली चाकणकर भडकल्या

(NCP Leader Rupali Chakankar criticize BJP at Solapur)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें