अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयच्या धाडीनंतर रुपाली चाकणकरांचं ट्विट, म्हणाल्या…

भरतीनंतर लाटांना ओहोटी येतेच किनारा मात्र निश्चल असतो. | Rupali Chakankar Anil Deshmukh house

अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयच्या धाडीनंतर रुपाली चाकणकरांचं ट्विट, म्हणाल्या...
रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर सीबीआयने टाकलेल्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विट केले आहे. लाटांनी कितीही खळखळाट केला तरीही किनारा मात्र धीरोदात्तपणे उभा असतो. भरतीनंतर लाटांना ओहोटी येतेच किनारा मात्र निश्चल असतो. केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर आहेत, असे चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (NCP leader Rupali Chakankar tweet after CBI raids on Anil Deshmukh house)

तब्बल 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने शनिवारी छापे टाकले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे मुंबईपासून ते नागपूरपर्यंतच्या अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. एकूण दहा ठिकाणी हे छापे मारले आहेत. मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटवर पहाटेच सीबीआयने छाप मारले आहेत.

उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिले , पण सीबीआयने धाडच टाकली: जयंत पाटील

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयाकडून प्राथमिक चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग धाड घालण्यासाठी करत आहे. या माध्यमातून सीबीआय अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची बदनामी करून राजकीय उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही, याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या:

रोज उठून त्यांचं नाटक चाललंय, केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी: चंद्रकांत पाटील

Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या घरी पीपीई किट घालून झाडाझडती; काळी बॅग आणि पिवळ्या पिशव्यांमध्ये नेमकं काय?

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; संजय राऊत म्हणतात…

(NCP leader Rupali Chakankar tweet after CBI raids on Anil Deshmukh house)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI