अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं ही कुणाची मेहरबानी नव्हती; सुनील तटकरे यांचा कुणावर निशाणा?

tv9 मराठीच्या 'लोकसभेचा महासंग्राम' या विशेष कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहे. तटकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्यामागे अजित पवार आणि बाकी आमदारांची काय भुमिका होती अशा अनेक प्रश्नांवर गोपनिय माहिती दिली आहे.

अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं ही कुणाची मेहरबानी नव्हती; सुनील तटकरे यांचा कुणावर निशाणा?
सुनील तटकरेImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 12:13 PM

मुंबई : अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हल्ली लोक फार मोठं समजण्याच्या नावाखाली काहीही बोलतात. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं ही मेहरबानी नव्हती. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद दिलं नसतं तर महाविकास आघाडीचं सरकार आठ दिवसही टिकलं नसतं, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला आहे. सुनील तटकरे यांनी केलेल्या या विधानामुळे राजकारणात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. tv9 मराठीच्या ‘लोकसभेचा महासंग्राम’ या विशेष कार्यक्रमात सुनील तटकरे पुढे म्हणाले की, मी हा दावा व्यासपीठावर करतो, कारण आमदारांच्या मनात दादांचा निर्णय योग्य होता. तीन पक्षाच्या सरकार पेक्षा दोन पक्षाचं सरकार हवं होतं. दादा आणि देवेंद्र जींचं सरकार चांगलं ठरलं असतं हे आमदारांना वाटत होतं.

सर्वोच्च न्यायालयाचा हेडकाऊंटचा निर्णय आला नसता तर निकाल वेगळा लागला असता. परिस्थिती वेगळी झाली असती. दादांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर आमदारांच्या मनातील स्फोट झाला असता. मनी बिल आल्यावर गुप्त मतदान होतं. अशावेळी काहीही घडलं असतं. जे घडतंय ते ओळखून अजितदादांची गरज ओळखून पक्षनेतृत्वाने त्यांना उपमुख्यमंत्री केलं. अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं ही कुणाची मेहरबानी नव्हती. पक्षाच्या अस्तित्वासाठीचा तो निर्णय होता, असं सुनील तटकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तो पहाटेचा शपथविधी नव्हता

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी का राजकिय दृष्ट्या कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, ती पहाटेची शपथ नव्हीत. ती 8 वाजेची शपथ होती. लख्ख प्रकाशात झाली. भाजपासोबत जाण्याची चर्चा ही 2014 पासूनच होती. पक्ष नेतृत्त्वाचा 2014ला भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला होता, तसेच 2016-17 मध्येही भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता अशी अंतर्गत माहिती माहिती तटकरे यांनी टिव्ही 9 च्या कार्यक्रमात दिली.  काळाच्या ओघात त्याची उत्तरे मिळतील. काळ हेच उत्तर आहे. असं म्हणत काही प्रश्नांवर रहस्य कायम ठेवले.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.