रायगडचे खासदार आणि पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचे कारस्थान सहन करणार नाही : सुरेश लाड

राष्ट्रवादीचे नेते सुरेश लाड यांनी प्रवीण दरेकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे (NCP leader Suresh Lad slams Pravin Darekar).

रायगडचे खासदार आणि पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचे कारस्थान सहन करणार नाही : सुरेश लाड
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 9:18 PM

रायगड : “रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांना बदनाम करण्याचे कारस्थान सहन केले जाणार नाही”, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपला दिला आहे (NCP leader Suresh Lad slams Pravin Darekar).

“पेणच्या मुख्याधिकारी यांच्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गटनेते आणि मुख्याधिकारी यांच्यातील वाद न्याय प्रविष्ट आहे. या वादाचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही. महिलांशी वागताना योग्यरीत्या वागावे. माता-भगिनींचा योग्य आदर राखावा”, अशा शब्दात सुरेश लाड यांनी सुनावलं (NCP leader Suresh Lad slams Pravin Darekar).

पेणचे मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी 16 ऑक्टोबरला झालेल्या स्थायी समितीमध्ये गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी अर्वाच्च भाषेत त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता, तसेच खुर्ची घेऊन मारायला धावल्याप्रकरणी पेण पोलिसांत अनिरुद्ध पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या विरोधात भाजपने काल (30 ऑक्टोबर) पेण बंदची हाक दिली होती. त्या हाकेला प्रतिसाद देत प्रवीण दरेकरही आंदोलनात सहभागी झाले आहेत.

या आंदोलनात प्रवीण दरेकर यांनी अनिरुद्ध पाटील यांच्यावर दाखल गुन्ह्यावरुन खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. तटकरे सत्तेचा गैरवापर करुन भाजप आमदारांना त्रास देत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांना सुरेश लाड यांनी प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, या आंदोलनात दरेकर यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. रायगडमध्ये सेनेचे तीन आमदार असूनही राष्ट्रावादीच्या एका आमदाराकडे मंत्रीपद असल्याने शतप्रतिशत भगवा फडकरणार कसा? असा सवाल दरेकरांनी केला होता. त्याला शिवसेनेचे नेते बबन दादा पाटील यांनी उत्तर दिलं.

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवलंय. कुणाचे किती आमदार, कुणाचे किती हा विचार करण्यापेक्षा शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे हा विचार करावा”, असा टोला बबन दादा पाटील यांनी लगावला.

संबंधित बातम्या :

अनिरुद्ध पाटील यांच्यावरील दाखल गुन्ह्याच्या निषेधार्थ पेण बंदची हाक

सुनील तटकरेंना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल : प्रवीण दरेकर

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.