AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचे 22 आमदार पवारांच्या संपर्कात? अखेर मुंबईतील बैठकीत सत्य समोर; भुजबळ म्हणाले सर्व आमदार…

मुंबईतील देवगिरी या शासकीय बंगल्यावर राष्ट्रादीच्या आजी-माजी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री, ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत आम्ही सर्व आमदार कोणाच्याही संपर्कात नाही, असे आमदारांनी सांगितले आहे. तशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे 22 आमदार पवारांच्या संपर्कात? अखेर मुंबईतील बैठकीत सत्य समोर; भुजबळ म्हणाले सर्व आमदार...
sunetra pawar and sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 26, 2026 | 9:21 PM
Share

NCP Meeting And MLA : गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडत आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल तसेच खासदार सुनिल तटकरे हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी नाराज नसल्याचं सांगितलेलं आहे. परंतु पक्षाची सर्व सूत्रं सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी आपल्या हाती घेतले आहेत. राष्ट्रवादी पक्षातील एकूण 20 ते 22 आमदार खासदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असा दावा केला जात होता. याच चर्चेचे उत्तर आता मिळाले आहे. मुंबईत देवगिरी या शासकीय बंगल्यावर राष्ट्रावादीच्या आजी-माजी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री, ज्येष्ठ नेते उपस्थित होते. याच बैठकीत आम्ही सर्व आमदार कोणाच्याही संपर्कात नाही, असे आमदारांनी सांगितले आहे. तशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

बैठकीत नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली

बैठक पार पडल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे. यावेळी त्यांनी आमदारांतील नाराजी यावर भाष्य केलं आहे. या बैठकीला प्रफुल्ल पटेल मात्र गैरहजर होते. निवडणूक आयोगाच्या SIR प्रणाली संदर्भात बैठकीत चर्चा झाली. बीएलओ आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कसं काम करावं या संदर्भात चर्चा झाली. त्या संदर्भात काही तज्ज्ञ लोक आले होते. त्यांनी मार्गदर्शन केलं.  10 जूनला पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्याची जागा ठरवली जाईल. त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमी संदर्भात बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

आमदारांमध्ये खरंच नाराजी आहे का?

गेल्या काही दिवसांपासून वीस ते बावीस आमदार पवार गटाच्या संपर्कात आहेत, अशा वावड्या पसरल्या होत्या. त्या संदर्भातसुद्धा बैठकीत चर्चा झाली. पण सर्व आमदारांनी छातीठोकपणे सांगितलं की आम्ही पक्षासोबतच आहोत. आम्ही कुणाच्या संपर्कात नाही, असे आमदारांनी सांगितले आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. नाराजी काही नाही, समोरुन लोक बोलतात म्हणून बातम्या ‌होतात, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या कांदा प्रश्नावरही भुजबळ यांनी यावेळी सांगितले. कांद्याच्या प्रश्नावर उद्या महायुतीचे शिष्टमंडळ दिल्लीत अमित शाहा यांची भेट घेणार आहे. सरकारचा प्रयत्न आहे की कांदा उत्पादकांना न्याय मिळावा, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

Follow Us
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...