आधी संदीप देशपांडे शरद पवारांच्या भेटीला, आता राष्ट्रवादीचा आमदार राज ठाकरेंच्या घरी!

आधी संदीप देशपांडे शरद पवारांच्या भेटीला, आता राष्ट्रवादीचा आमदार राज ठाकरेंच्या घरी!

मनसे आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना भेटत असल्याने नवीच राजकीय चर्चा होत आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती.

सचिन पाटील

|

Oct 31, 2019 | 12:29 PM

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकीय भेटीगाठी सुरु आहेत. एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये (Shiv Sena BJP) मुख्यमंत्रिपदावरुन तणातणी असताना, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या भेटी घेत आहेत. पुढील रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress NCP) नेत्यांची शरद पवार यांच्या घरी बैठक झाली.

दरम्यान, एकीकडे या भेटीगाठी सुरु असताना, मनसे आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना भेटत असल्याने नवीच राजकीय चर्चा होत आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचा आमदार (Atul Benke meet Raj Thackeray) थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे नवनिर्वाचित आमदार अतुल बेनके (Atul Benke meet Raj Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज इथे सदिच्छा भेट घेतली. केवळ राज ठाकरे यांना भेटण्यासाठी अतुल बेनके हे  कृष्णकुंजवर पोहोचले. त्यामुळे या भेटीमागे कोणताही राजकीय अर्थ नाही.

संदीप देशपांडे पवारांच्या भेटीला

विधानसभा निवडणुकीतील मनसेचे उमेदवार आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट (Sandeep Deshpande meets Sharad Pawar) घेतली. पवारांच्या कार्यपद्धतीबाबत प्रभावित होऊन देशपांडेंना शरद पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. संदीप देशपांडे यांनी काल सकाळी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पवार आणि देशपांडे यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे.

खळ्ळ-खटॅक फेम संदीप देशपांडे

संदीप देशपांडे हे मनसेच्या तिकीटावर मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले होते. संदीप देशपांडे यांनी ईव्हीएमच्या मुद्दयावरुन सरकारवर अनेक वेळा तोफ डागली आहे. पत्रकार परिषदेला घाबरणारे पंतप्रधान ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या साहसी खेळात कसे सहभागी होतात? असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी थेट पंतप्रधानांना सवाल केला होता.

मुंबई मेट्रोच्या भूमिपूजनाच्या शिळेवर मराठी भाषेला बगल दिल्याबद्दलही संदीप देशपांडेंनी सरकारवर टीका केली होती.

संबंधित बातम्या 

शरद पवारांच्या कार्यपद्धतीने प्रभावित, संदीप देशपांडे ‘सिल्व्हर ओक’वर  

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें