AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संदीप क्षीरसागरांचा पुन्हा धक्का, जयदत्त काकांचा खंदा समर्थक शिवसेनेतून राष्ट्रवादीत

शाहेद पटेल यांच्यासह 101 समर्थकांचा प्रवेश घेऊन संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना धक्का दिला आहे (Sandeep Kshirsagar Beed Nagarpalika Election)

संदीप क्षीरसागरांचा पुन्हा धक्का, जयदत्त काकांचा खंदा समर्थक शिवसेनेतून राष्ट्रवादीत
जयदत्त क्षीरसागर यांचे खंदे समर्थक शाहेद पटेल राष्ट्रवादीत
| Updated on: Mar 22, 2021 | 1:16 PM
Share

बीड : बीड नगरपालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) या काका-पुतण्यात चालणारी रस्सीखेच पुन्हा शिगेला पोहोचली आहे. पटेल फाऊंडेशनचे शाहेद पटेल (Shahed Patel) यांनी जयदत्त क्षीरसागर यांना सोडचिठ्ठी देऊन संदीप क्षीरसागर यांच्याशी हातमिळवणी केली. बीडमध्ये शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (NCP MLA Sandeep Kshirsagar jolt to Shivsena Leader Uncle Jaydutt Kshirsagar ahead of Beed Nagarpalika Election)

कोण आहेत शाहेद पटेल?

आमदाक संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात शाहेद पटेल यांनी राष्ट्रवादी भवनमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. पटेल फाऊंडेशन हे सामाजिक संघटन आहे. संचालक शाहेद पटेल यांचं बलाबल मोठं आहे. पटेल फाऊंडेशनचे जिल्ह्यात मोठे नेटवर्क आहे. अनेक ग्राम पंचायत सदस्य देखील पटेल यांच्याकडे आहेत. शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांचे खंदे समर्थक म्हणून शाहेद पटेल यांची जिल्ह्यात ओळख होती. मात्र अचानक जयदत्त क्षीरसागर यांना पटेलांनी सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे समजते.

आ. संदीप क्षीरसागर यांचे पारडे जड

बीड नगरपालिका निवडणूक काही महिन्यातच होणार आहे. याच धर्तीवर संदीप क्षीरसागर यांच्याकडून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आ. संदीप क्षीरसागर यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यातच काही दिवसात राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का दिला होता.

शिवसंग्राम नेत्याचा राष्ट्रवादी प्रवेश

दीड महिन्यापूर्वीच शिवसंग्राम मधील विनोद दादा हातांगळे यांचा दीडशे कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन आ. विनायक मेटे यांना धक्का दिला होता. पेठ बीड परिसरात विनोद हातांगळे यांची मोठी पकड आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने हातांगळे यांच्यासह 150 कार्यकर्त्यांना जाहीर प्रवेश देऊन रिकामी झालेली पोकळी भरून काढली आहे.

आज शाहेद पटेल यांच्यासह 101 समर्थकांचा प्रवेश घेऊन काका जयदत्त क्षीरसागर यांना धक्का दिला आहे. बीड विधानसभा मतदार संघात सध्या आ. संदीप क्षीरसागर यांचे पारडे मात्र जड झाले आहे.

संबंधित बातम्या :

क्षीरसागर काका पुतण्याचं राजकीय वॉर, शिवसंग्रामला मोठा धक्का, राष्ट्रवादीत दीडशे जणांचा प्रवेश

(Sandeep Kshirsagar Beed Nagarpalika Election)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.