राष्ट्रवादीच्या संपर्कहीन आमदाराला शिवसेना नेत्यांनी विमानतळावर पकडलं, गाडीत बसवून हॉटेलवर आणलं!

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात क्षणोक्षणी नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीच्या एका आमदाराला शिवसेना नेत्यांनी अक्षरश: विमानतळावरुन पकडलं आहे. 

NCP MLA Sanjay Bansod, राष्ट्रवादीच्या संपर्कहीन आमदाराला शिवसेना नेत्यांनी विमानतळावर पकडलं, गाडीत बसवून हॉटेलवर आणलं!

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात क्षणोक्षणी नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीच्या एका आमदाराला शिवसेना नेत्यांनी अक्षरश: विमानतळावरुन पकडलं आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूरमधील उदगीरचे आमदार संजय बनसोड (NCP MLA Sanjay Bansod) यांना मुंबई एअरपोर्ट जवळील सहार हॉटेलमधून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि  शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर संजय बनसोड (NCP MLA Sanjay Bansod) यांना हॉटेल ललितमध्ये आणून भाजपने केलेल्या अपहरणाविषयी विचारपूस केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात नसलेले आमदार संजय बनसोड यांची माहिती शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली. त्यानंतर पवारांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे हे हॉटेल ललितमध्ये आले आणि आमदार संजय बनसोड यांना सोबत घेऊन जाण्यास निघाले. मात्र आमदारांच्या सुरक्षेसाठी स्वत: शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी संजय बनसोड यांनी कार ध्ये बसवून शरद पवार यांच्या ताब्यात देण्यासाठी हॉटेल ललितमधून निघाल्याने, सत्तासंघर्षात काय काय करावं लागत आहे, हे दिसून येत आहे.

11 पैकी 7 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात

राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी (NCP MLA on Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना फसवून राजभवनात नेल्याचा आरोप होत आहे. अजित पवार यांच्या शपथविधीला राजभवनात उपस्थित असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांनी (NCP MLA on Ajit Pawar) याबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. यात आमदार राजेंद्र शिंगणे आणि सुनिल भुसारा यांचा समावेश आहे. संबंधित आमदारांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचंही स्पष्ट केलं.

अजित पवारांसोबत 11 आमदार होते. यामध्ये सुनील शेळके,संदीप क्षीरसागर,राजेंद्र शिंगणे,नरहरी झिरवळ,बाबासाहेब पाटील,अनिल पाटील,सुनील भुसारा,माणिकराव कोकाटे,दिलीप बनकर,सुनील टिंगल, दौलत दरोडा यांचा समावेश होता. मात्र यापैकी 7 आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या बैठकीला परतले आहेत.

आमदार राजेंद्र शिंगणे यांची प्रतिक्रिया

आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, “रात्री 12 वाजता अजित पवार यांचा फोन आला. सकाळी 7 वाजता त्यांनी बंगल्यावर महत्त्वाच्या विषयावर काही चर्चा करण्यासाठी बोलावले. तसेच सकाळी 8 वाजता त्यांना बबनदादा यांच्या कारखान्यावर जायचं आहे, असंही सांगितलं. त्याप्रमाणे मी सकाळी 7 वाजता बी4 या बंगल्यावर पोहचलो. माझ्याआधी तेथे 2-3 आमदार आलेले होते. 15 मिनिटात तेथे 9-10 आमदार आले. आम्ही पावणेआठ पर्यंत तेथे बसलो. 7.45 वाजता मुंबईत कुठेतरी एका ठिकाणी बसायचं आहे, असा निरोप आला. तेथे सर्वांना एकत्र येण्यास सांगितलं. म्हणून आम्ही सर्व 10 जण तेथे जाण्यासाठी निघालो. मात्र, 15 मिनिटातच जेव्हा राजभवनावर पोहचलो. त्यावेळी आम्ही सर्वजण अस्वस्थ झालो.”

संबंधित बातम्या 

“अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फसवलं”  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *