मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय : अमोल कोल्हे

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली, मात्र त्यांनी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे.

मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय : अमोल कोल्हे
Follow us
| Updated on: Jul 08, 2020 | 5:19 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घेतली. ती निगेटिव्ह आली, मात्र खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन व्हायचे ठरवल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी ट्वीट करुन दिली. (NCP MP Dr Amol Kolhe Home Quarantine Corona Test Negative)

अमोल कोल्हे यांचे ट्वीट काय?

“आपल्याला एक महत्वाची माहिती शेअर करत आहे. एक जुलै ते चार जुलै या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. हे समजल्यानंतर मी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे.” अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली.

“माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र पुरेशी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौऱ्यावर असताना, अनेकदा नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत.” असेही कोल्हे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : “फील्डवर छान काम, आता काळजी घ्या” पुण्याचे कोरोनाग्रस्त महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्र्यांचा फोन

“मी स्वतः डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये, या भावनेतून होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे.” अशी ग्वाही अमोल कोल्हे यांनी दिली.

हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

“सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून विकास कामांमध्ये कुठे खंड पडू देणार नाही. काही अडचण असल्यास आपण मला सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अथवा संपर्क कार्यालय मध्ये संपर्क करु शकता.” असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे.

नुकतेच, बंगल्यावरचा टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन झाले आहेत. यापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. हे तिन्ही मंत्री कोरोनावर मात करत आपल्या घरी परतले आहेत.

(NCP MP Dr Amol Kolhe Home Quarantine Corona Test Negative)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.