आशीर्वाद पाठीशी राहू द्या, उदयनराजे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे आज खासदारकीचा राजीनामा देणार आहेत.

आशीर्वाद पाठीशी राहू द्या, उदयनराजे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे आज (14 सप्टेंबर) खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. उदयनराजे (Udayanraje Bhosale) उद्या शनिवारी (14 सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे उदयनराजेंचा राजीनामा स्वीकारण्यासाठी दिल्लीत आहेत. उदयनराजे आज लोकसभा अध्यक्षांकडे रात्री आठ वाजता राजीनामा सादर करतील. त्यानंतर उद्या भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत उदयनराजेंचा भाजपप्रवेश होईल. उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale join bjp) स्वत: काही तासांंपूर्वी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

“आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे, आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील”, असे ट्विट करत त्यांनी कार्यकर्त्यांना भाजप प्रवेशाची माहिती दिली आहे.

उदयनराजेंच्या पक्षप्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

शरद पवारांची भेट

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते राष्ट्रवादीत कायम राहणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाला पुन्हा फोडणी दिली. उदयनराजे हे भाजपात येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

दिल्लीत जाऊन अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होईल, असंही त्यांनी काल म्हटलं होतं. त्यामुळे उदयनराजे राष्ट्रवादीत राहणार की भाजपात जाणार याबाबत चर्चा सुरु होत्या. अखेर उदयनराजे आज भाजप प्रवेश करणार हे निश्चित आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *