बाप बापच असतो, कोल्हापुरात पोस्टर लावून राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं

'बाप बापच असतो' असं लिहिलेले पोस्टर कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेस संघटनेने लावले आहेत.

बाप बापच असतो, कोल्हापुरात पोस्टर लावून राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं
Follow us
| Updated on: Oct 27, 2019 | 11:04 AM

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला असला, तरी एकहाती यश न मिळाल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंजावातामुळे पक्षाने अनपेक्षित यश मिळवलं आहे. त्यानंतर कोल्हापुरात राष्ट्रवादीने भाजपला डिवचणारे पोस्टर (NCP Poster in Kolhapur to tease BJP) लावले आहेत.

‘बाप बापच असतो’ असं लिहिलेले पोस्टर कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेस संघटनेने लावले आहेत. या पोस्टरवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा भव्य फोटो आहे. कोल्हापुरातून भाजप हद्दपार झाल्यामुळे राष्ट्रवादीने ही पोस्टरबाजी केली आहे.

भाजपला कोल्हापुरात क्लीन स्वीप मिळाली आहे. कोल्हापुरात भाजपचे दहापैकी दोन आमदार होते. या दोन्ही आमदारांना भाजपने तिकीट दिलं होतं, परंतु त्यांना आपली जागा टिकवता आली नाही. भाजप आमदार अमल महाडिक यांना काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या ऋतुराज पाटील यांनी पराभवाची धूळ चारली, तर भाजप आमदार सुरेश हळवणकर यांचं साम्राज्य अपक्ष लढलेले काँग्रेसचे बंडखोर प्रकाश आव्हाडे यांनी खालसा केलं.

कोल्हापुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सात जागा निवडून आलेल्या आहेत. चार जागांवर काँग्रेस, दोन जागांवर राष्ट्रवादी तर एका जागेवर जनसुराज्य पक्षाचा आमदार जिंकला. अपक्ष लढलेले काँग्रेसचे बंडखोर प्रकाश आव्हाडे महाआघाडीलाच पाठिंबा देण्याची शक्यता आहे. उर्वरित दोन जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत.

राष्ट्रवादीने आपल्या दोन्ही जागा टिकवल्या, मात्र सत्ताधारी शिवसेना-भाजपकडे असेलल्या उर्वरित आठ जागांपैकी केवळ दोन जागा शिवसेनेला टिकवता आल्या आहेत. पूरग्रस्तांना मदतीच्या पाकिटावर सुरेश हळवणकर यांनी स्वतःचे फोटो टाकल्यानंतर टीकेची झोड उठली होती. पुराच्या वेळी दाखवलेल्या हलगर्जी आणि असंवेदनशीलतेचा फटका महायुतीला बसल्याचं बोललं जातं.

“परळीतील मतदारांची मोठी चूक, पंकजा मुंडेंसाठी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार”

साताऱ्यात पावसात भिजत शरद पवारांनी घेतलेल्या सभेचा मोठा परिणाम पाहायला मिळाला होता. अगदी लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपवासी झालेल्या उदयनराजेंचा पराभव होऊन राष्ट्रवादीला आपली जागा टिकवण्यात यश आलं.

पश्चिम महाराष्ट्रात ढासळणारे राष्ट्रवादीचे बुरुज विधानसभेला मजबूत स्थितीत राहिले आहेत. निवडणुकीत कोल्हापूरसह सोलापूर, सांगली, साताऱ्यातही आघाडीला चांगलं यश आलं आहे. त्यामुळे उत्साह भरलेल्या राष्ट्रवादीने नव्या जोमाने पोस्टरबाजी (NCP Poster in Kolhapur to tease BJP) केल्याचं दिसत आहे.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.