AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, नवनीत राणा, भुजबळ नव्हे आता हा नेताही इच्छुक, सस्पेन्स वाढला

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आता उमेदवारीसाठी नवनीत राणा, भुजबळ यांच्याऐवजी बीडचे अमरसिंह पंडित आणि भंडाराचे राजेंद्र जैन यांच्या नावाचीही बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, नवनीत राणा, भुजबळ नव्हे आता हा नेताही इच्छुक, सस्पेन्स वाढला
Amarsinh Pandit NCPImage Credit source: Google
| Updated on: Jun 07, 2026 | 10:01 PM
Share

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आता उमेदवारीसाठी नवनीत राणा, भुजबळ यांच्याऐवजी बीडचे अमरसिंह पंडित आणि भंडाऱ्याचे राजेंद्र जैन यांच्या नावाचीही बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यसभेची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कुणाला संधी द्यायची यासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे नेते उपस्थित आहेत. राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र आता बीडचे अमरसिंह पंडित आणि भंडाऱ्याचे राजेंद्र जैन यांच्या नावाचीही बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भुजबळांची अट

समोर आलेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते आग्रही आहेत. राज्यसभेवर गेल्यावर आपला पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिपद मिळावं अशी भुजबळांची इच्छा आहे. मात्र समीर भुजबळ यांना मंत्री करण्यास भाजप श्रेष्ठींकडून नकार आल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांनी समीर भुजबळांना मंत्री केले तरच राज्यसभेवर जाणार असल्याची अट घातल्याने तिढा वाढला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून नवीन नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, काल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या बैठकीला हजर होते. या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीसांसमोर आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर कालही राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रदीर्घ बैठक पार पडली होती.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं