“राज्यपालांचा इतिहास कच्चा, मोदी मोठे नेते, पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काम केलं नाही, असं नाही”, रोहित पवारांचं ट्विट

रोहित पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल भगतसिंह कोस्यारी यांना टोला

राज्यपालांचा इतिहास कच्चा, मोदी मोठे नेते, पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काम केलं नाही, असं नाही, रोहित पवारांचं ट्विट
आयेशा सय्यद

|

Aug 05, 2022 | 10:49 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर टीका केली आहे. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खोचक टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे नेते आहेत. त्यांचा देशाच्या प्रगतीतही मोठी वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही कामच केलं नाही, असा त्याचा अर्थ होत नाही, असं रोहित पवार म्हणालेत. “राज्यपाल महोदयांचा केवळ250-350 वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचं वाटायचं पण त्यांचं कालचं वक्तव्य बघता मागील 70 वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदीसाहेब (PM Narendra Modi) हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केलं नाही, असं नाही”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

“आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे”, असंही रोहित पवार म्हणालेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें