आता मायावतींच्या आयुष्यावर चित्रपट?

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, एनटी रामाराव आणि जयललिता यांच्यानंतर आता उत्तरप्रेदशातील जेष्ठ नेत्या मायावती यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवला जाणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष कपूर करणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, अद्याप कुणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. विशेष म्हणजे, मायावती यांची […]

आता मायावतींच्या आयुष्यावर चित्रपट?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, एनटी रामाराव आणि जयललिता यांच्यानंतर आता उत्तरप्रेदशातील जेष्ठ नेत्या मायावती यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवला जाणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष कपूर करणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, अद्याप कुणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. विशेष म्हणजे, मायावती यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन साकारणार असल्याची चर्चा आहे.

भारतीय राजकारणात सक्षम नेत्या म्हणून मायावती यांची ओळख आहे. मायावती यांनी आतापर्यंत चारवेळा उत्तरप्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. तसेच, देशातील अनेक राज्यात मायावती यांच्या पक्षाची ताकद आहे.

कोण आहेत मायावती?

देशात मागासवर्गीयांच्या प्रतिनिधी म्हणून मायावती यांची ओळख आहे. तसेच देशातील पहिली मागासवर्गीय महिला मुख्यमंत्री म्हणूनही मायावती यांची ओळख आहे. मायावती या बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. तसेच मागासवर्गीय, ओबीसी आणि मुस्लीम समाजासाठी बहुजन समाज पार्टी काम करते. मायावती सर्वात पहिल्यांदा 1995 मध्ये उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या. आतापर्यंत 1995, 1997, 2002 आणि 2007 अशा चार वेळेस मायावती यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे.

15 जानेवारी 1956 रोजी मायावती यांचा नवी दिल्ली येथे जन्म झाला. मायावती यांचं शिक्षण BA, B.ED., आणि LLB झालं आहे. दिल्ली विद्यापीठातून मायावती यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर त्यांनी बसपामध्ये काम करण्यास सुरुवात केली.

Non Stop LIVE Update
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.