Kalicharan maharaj : जातीवाद छोडीये हिंदुत्व जोडीये, कालीचरण महाराजाचा पुन्हा नवा नारा

पोलिसांच्या वाहनातून महाराजने जातीवाद छोडीये हिंदुत्व जोडीयेचा दिला नारा दिला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींवर वादग्रस्त वक्तव्य करणा-या अभिजित उर्फ कालीचरण सराटवर वर्धा शहर पोलिसात भादवीच्या कलम 153, 502(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Kalicharan maharaj : जातीवाद छोडीये हिंदुत्व जोडीये, कालीचरण महाराजाचा पुन्हा नवा नारा
कालीचरण महाराजच्या जामीन अर्जावर 20 जानेवारीला सुनावणी होणार
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 3:35 PM

महात्मा गांधींबद्दल (mahatma gandhi) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिजित उर्फ कालीचरण(kalaicharan maharaj) सराटला आज वर्धा पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. रायपूर येथून पहाटे तीन वाजता आणल्यावर महाराजला सेवाग्राम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. सकाळी 11 वाजता दरम्यान सेवाग्राम येथून पोलिस न्यायलयात नेत असताना महाराजाने परत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पोलिसांच्या वाहनातून महाराजने जातीवाद छोडीये हिंदुत्व जोडीयेचा दिला नारा दिला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींवर वादग्रस्त वक्तव्य करणा-या अभिजित उर्फ कालीचरण सराटवर वर्धा शहर पोलिसात भादवीच्या कलम 153, 502(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालीचरण हे छत्तीसगढ राज्यातील रायपूरच्या सेंट्रल जेलमध्ये या प्रकरणी अटकेत होते. यानंतर त्यांना वर्धा शहर पोलिसांनी काल संध्याकाळी पाच वाजता ताब्यात घेत वर्ध्यात आणले. मध्यरात्री तीन वाजता दरम्यान कालिचरण यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. त्यांची सेवाग्राम पोलीस ठाण्यात विचारपूस करत सकाळी अकरा वाजता महाराजाला न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांनी बाहेर काढले. न्यायाल्याने त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावली. यानंतर आरोपीच्या वकिलांनी महाराजाचा जमीन अर्ज दाखल केला. यावर न्यायालयात अद्याप निर्णय आलेला नाहीय. न्यायालयीन कोठडी सुनावल्याने वर्धा पोलिस परत महाराजाला नियमानुसार रायपूर येथील कारागृहाला सुपूर्द करणार आहे.

कालीचरणविरोधात काँग्रेस संतप्त

वर्ध्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांच्या तक्रारीवरून 28 डिसेंबर रोजी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकारणी गुन्हा दाखल होता. आज कालीचरणला न्यायालयात हजर केले असता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. सुरवातीला महाराजाला न्यायालयात दुपारी तीन वाजता हजर करणार असल्याची माहिती आरोपी आणि तक्रारदार यांच्या वकिलांना देण्यात आली होती. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आरोपीला सकाळी 11 वाजता हजर केल्याने वकिलांची तारांबळ उडाली होती. कालिचरण महाराज न्यायलयात आणले असल्याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळताच काळ्या फिती लावून कार्यकर्त्यांनी न्यायालय परिसरात यायला सुरवात केली. मात्र कार्यकर्ते येण्यापूर्वी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करून परत नेल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

कालीचरणविरोधात अनेक तक्रारी

26 डिसेंबरला कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य रायपूरच्या धर्मपरिषदेत केले होते. यानतंर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत रायपूरसह महाराष्ट्राच्या पुणे, वर्धा, अकोला, ठाणे आणि कल्याण येथे महाराजावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात महाराजाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले होते तर आज वर्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज न्यायालयाच्या प्रक्रियेनंतर वर्धा पोलीस आरोपी कालीचरणला पुन्हा रायपूर कारागृहाच्या सुपूर्द करणार आहे. यानंतर अकोला, ठाणे आणि कल्याण पोलीस सुद्धा यांचा ताबा घेणार असल्याची माहिती आहे.

सोबतच त्याचे व्हॉइस सॅम्पल सुद्धा घेण्यात आले. त्यानंतर कालीचरणाला नाश्त्यासाठी विचारण्यात आले असता त्याने नकार दिला. न्यायालयातील सुनावणीनंतर कालीचरणला पोलीस मुख्यालयात आणण्यात आले तेथे त्याला पोलीस मुख्यालयातील मेस मधून जेवण देण्यात आले. यावेळी त्याने केवळ वरण आणि पोळी खाल्याची माहिती आहे. दुपारी अडीच वाजता दरम्यान वर्धा पोलिसांनी पुन्हा त्याला रायपूर येथे नेले.

Health care| तुम्ही व्यायामाला कधी सुरुवात करावी? तुमच्या शरीराचं घड्याळ चेक केलात का?

Birthday Special : रामायणाची जादू, प्रभू रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल दिसताक्षणी लोक पाया पडायचे!

भाच्याचा मामीवर बलात्कार, शूटिंग करुन पुन्हा रुमवर येण्यासाठी ब्लॅकमेल, व्हिडीओ पाहून मामाने…

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.