नव्या खासदारांसाठी दिल्लीत बंगल्यांचं वाटप, कुणाला काय मिळणार?

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नव्या लोकसभा अध्यक्षाच्या निवडीनंतर पहिली समिती नियुक्त केली जाईल आणि घरांचं वाटप होईल. सध्या 250 नव्या खासदारांचा निवास विविध राज्यांची भवने आणि वेस्टर्न कोर्टात आहे.

नव्या खासदारांसाठी दिल्लीत बंगल्यांचं वाटप, कुणाला काय मिळणार?
Follow us
| Updated on: Jun 05, 2019 | 10:36 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या खासदारांना राजधानी दिल्लीत लवकरच बंगला आणि फ्लॅट मिळणार आहे. खासदार सध्या अस्थायी ठिकाणी राहत आहेत. पण गृह समितीकडून लवकरच बंगले आणि फ्लॅटची वाटप केली जाईल. लोकसभा पूलमध्ये एकूण 517 घरं आहेत, ज्यात टाईप-8 बंगल्यापासून ते छोट्या फ्लॅटचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नव्या लोकसभा अध्यक्षाच्या निवडीनंतर पहिली समिती नियुक्त केली जाईल आणि घरांचं वाटप होईल. सध्या 250 नव्या खासदारांचा निवास विविध राज्यांची भवने आणि वेस्टर्न कोर्टात आहे.

नव्या खासदारांनी त्यांच्या आवडीनुसार फॉर्म जमा केला आहे. खासदारांनी दिलेल्या माहितीनुसार डेटा हाऊस कमिटीला दिला जाईल आणि कमिटीकडून या आधारावरच बंगल्यांच्या वाटपासाठी नियम लक्षात घेतले जातील. हाऊस कमिटी विविध श्रेणींमध्ये उपलब्ध असलेले फ्लॅट आणि त्यासाठी मिळालेले अर्ज याच्या आधारावर निर्णय घेते.

लोकसभा पूलमध्ये राहण्याच्या ठिकाणांमध्ये 159 बंगले, 37 ड्युअल फ्लॅट, 193 सिंगल फ्लॅट, 96 बहुमजली इमारतीमध्ये आणि 32 घरं विविध ठिकाणी आहेत. सेंट्रल दिल्ली, नॉर्थ एवेन्यू, साऊथ एवेन्यू, मीना बाग, बिशम्बर दास मार्ग, बाबा खडक सिंह मार्ग, टिळक लाईन आणि विठ्ठल भाई हाऊसमध्ये ही घरं उपलब्ध आहेत. सर्व विद्यमान खासदारांना घर खाली करण्यासाठी 24 मेपासून एक महिन्याचा कालावधी देण्यात आलाय.

टाईप-5 निवासस्थानांमध्ये चार श्रेणी आहेत. टाईप-5 (ए) एक ड्रॉईंग रूम आणि एक बेडरूम सेट, टाईप-5 (बी) एक ड्रॉईंग रूम आणि दो बेडरूम सेट, टाईप-5 (सी) ड्रॉईंग रूम आणि तीन बेडरूम सेट, तर टाईप-5 (डी) ड्रॉईंग रूम आणि चार बेडरूम सेट आहे. संयुक्त फ्लॅट टाईप-(ए/ए), संयुक्त फ्लॅट टाईप-5 (ए/बी) आणि संयुक्त फ्लॅट टाईप-5 (बी/बी) उपलब्ध आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, हाऊस कमिटीकडून नियम तयार केले जातील. पण सर्वोच्च श्रेणीतील बंगले वरिष्ठ सदस्यांना दिले जातात. विद्यमान खासदारांना लोकसभा अध्यक्षाच्या परवानगीने आणखी चार महिन्यांसाठी राहू दिलं जाऊ शकतं. तर प्रकृतीच्या कारणास्तव आणकी सहा महिने दिले जाऊ शकतात. यावेळी अनेक खासदार पहिल्यांदाच निवडून गेले आहेत. त्यामुळे कोणतं निवासस्थान कुणाला मिळतं याबाबत सर्वच खासदारांना उत्सुकता लागली आहे.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.