CBI चं पथक रत्नागिरीत आल्यावरच पोलीस अधीक्षकांना कोरोना कसा झाला? निलेश राणेंचा सवाल; गर्ग यांच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित

CBI चं एक पथक रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहे. मात्र, हे पथक आल्यावरच पोलीस अधीक्षकांना (Superintendent of Police) कोरोना कसा काय झाला? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलाय.

CBI चं पथक रत्नागिरीत आल्यावरच पोलीस अधीक्षकांना कोरोना कसा झाला? निलेश राणेंचा सवाल; गर्ग यांच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित
निलेश राणे, मोहित कुमार गर्गImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 9:06 PM

रत्नागिरी : जिल्हाचे पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग (Mohit Kumar Garg) यांच्यावर मनमानीचा कारभाराचा आरप करत भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) चांगलेच आक्रमक बनलेत. CBI चं एक पथक रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहे. मात्र, हे पथक आल्यावरच पोलीस अधीक्षकांना (Superintendent of Police) कोरोना कसा काय झाला? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलाय. तसंच संबंधित यंत्रणेला गर्ग यांच्या मनमानी कारभाराची माहिती देणार असल्याचंही निलेश राणे म्हणाले. मोहितकुमार गर्ग यांच्या कार्यपद्धतीबद्दल निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील वादग्रस्त रिसॉर्टच्या केसमध्ये गर्ग यांच्या भूमिकेवर निलेश राणे यांनी सवाल उपस्थित केले होते. तर काही दिवसांपूर्वी दापोली पोलीस स्थानकाला लागलेल्या आगीबद्दल विविध संशय व्यक्त करतानाच मोहितकुमार गर्ग सातत्याने दापोलीत का असतात? सरकारी निवासव्यवस्था नाकारून गर्ग यांच्या खासगी निवासस्थानाचा खर्च कोण भागवते? दापोली पोलीस स्थानकाला आग लागल्यानंतर गर्ग थोड्या वेळातच तिथे कसे काय पोहोचले? रत्नागिरीतील त्यांच्या केबिनच्या नूतनीकरणाचा खर्च कोण करतोय? असे सवाल उपस्थित करून खळबळ उडवली आहे.

हे सुद्धा वाचा

‘SP आहात म्हणून मनमानी चालणार नाही’

त्यानंतर आता निलेश राणे यांचे ट्विट रत्नागिरी जिल्ह्यात चर्चेत आले आहे. ”मागच्या काही दिवसांपूर्वी मी रत्नागिरी SP मोहित कुमार गर्ग यांच्यावर आरोप केले होते. CBI ची एक टीम रत्नागिरी मध्ये 3 दिवसासाठी दाखल झाली, दौऱ्याची माहिती मिळताच SP यांना कोरोना झाला. काही झालं तरी संबंधित यंत्रणेकडे मी माहिती देणार. पण SP आहात म्हणून मनमानी चालणार नाही.”, असं ट्विट निलेश राणेंनी केलंय. सध्या सीबीआयची टीम रत्नागिरी दौऱ्यावर असताना निलेश राणे यांनी पोलीस अधीक्षकांविरोधात घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.

निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवरही निशाणा

निलेश राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जापान दौऱ्याची आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या स्विझर्लंड दौऱ्याची तुलना करत जोरदार टीका केली. ‘मोदी साहेबांचा जपानचा दौरा 48 तासाचा होता. 48 तासात जवळपास 28 मीटिंग करून पहाटे 4 वाजता भारतात पोहोचले आणि 11 वाजता भारत सरकारची कॅबिनेट पार पाडली. प्रदूषण मंत्री आदित्य ठाकरे PR team मार्फत स्विझर्लंडला 2 इंटरव्ह्यू द्यायला गेला तिथून आराम करायला लंडनला गेला. हा फरक आहे’, अशी टीका निलेश राणे यांनी केलीय.

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.