राहुल गांधींचे तीन प्रश्न, गडकरींचे सविस्तर उत्तरं

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या बिनधास्त बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. त्यांनी एका कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांना सल्ला दिला की, अगोदर घर सांभाळा, जो घर सांभाळू शकत नाही तो देश काय सांभाळणार? हे वक्तव्य गडकरींनी केलं आणि त्याचे अनेकांनी आपापल्या पद्धतीने अर्थ लावले. काँग्रेस अध्यक्ष राहु गांधींनीही याच वक्तव्याचा आधार घेत गडकरींना एक विनंती […]

राहुल गांधींचे तीन प्रश्न, गडकरींचे सविस्तर उत्तरं
Follow us

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या बिनधास्त बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. त्यांनी एका कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांना सल्ला दिला की, अगोदर घर सांभाळा, जो घर सांभाळू शकत नाही तो देश काय सांभाळणार? हे वक्तव्य गडकरींनी केलं आणि त्याचे अनेकांनी आपापल्या पद्धतीने अर्थ लावले. काँग्रेस अध्यक्ष राहु गांधींनीही याच वक्तव्याचा आधार घेत गडकरींना एक विनंती केली.

राहुल गांधी म्हणाले तुमच्या बोलण्याच्या हिंमतीबद्दल दाद देतो. भाजपात बोलण्याची हिंमत करु शकतो असे तुम्हा एकमेव नेते आहेत. पण राफेल डील आणि अनिल अंबानी प्रकरण, शेतकरी समस्या आणि सरकारी संस्था या प्रकरणावरही जरा बोला, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं. गडकरींच्या वक्तव्याच्या एका बातमीला राहुल गांधींनी कोट केलं होतं.

नितीन गडकरींनी राहुल गांधींच्या या वक्तव्याला उत्तर दिलं. माझ्या हिंमतीसाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, पण एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला आमच्या सरकारवर टीका करण्यासाठी एका वृत्ताचा आधार घ्यावा लागतो याचं आश्चर्य वाटतं, असं म्हणत गडकरींनी राहुल गांधींच्या तीन प्रश्नांची उत्तरंही दिली.

पहिला प्रश्न

राहुल गांधींनी राफेलवर प्रश्न विचारला होता. यावर गडकरींनी उत्तर दिलं. “तुम्हाला आमच्यावर निशाणा साधण्यासाठी कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवावी लागते हेच आमचं यश आहे. राहिला प्रश्न तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्याचा, तर मी हे डंका वाजवून सांगू शकतो, की आमच्या सरकारने जनहीत समोर ठेवत सर्वात पारदर्शक व्यवहार केलाय.”

दुसरा प्रश्न

राहुल गांधींनी विचारलेल्या शेतकरी प्रश्नावरही गडकरींनी उत्तर दिलं. “तुमच्या धोरणांनी शेतकऱ्यांना ज्या वाईट परिस्थितीत आणून ठेवलं होतं, त्यातून बाहेर काढण्याचं काम मोदींनी केलंय आणि यात आम्हाला यशही मिळालंय. तुमच्यासह इतर काही लोकांना नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधान होणं आवडलेलं नाही, त्यामुळे असहिष्णुता आणि घटनात्मक संस्थांवर हल्ले झाल्याचे स्वप्न पडतात.”

तिसरा प्रश्न

सीबीआयमध्ये सध्या जे सुरु आहे, त्यावरुही राहुल गांधींनी प्रश्न विचारला होता. त्यावर गडकरींनी उत्तर दिलं, “आमच्या आणि काँग्रेसच्या डीएनएमध्ये हाच फरक आहे, की आम्ही घटनात्मक संस्थांवर विश्वास ठेवतो. तुमचे हे कट आता चालत नाहीयेत. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील आणि आम्ही मजबुतीने देशाला पुढे नेऊ, पण तुम्ही पुढच्या वेळी आणखी जबाबदारीने आणि समजदारीने वर्तन कराल, अशी अपेक्षा करतो”, असं गडकरी म्हणाले.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI