‘गोव्याच्या जनतेनं शिवसेना, राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवली’, फडणवीसांच्या सत्कारावेळी गडकरींची टोलेबाजी

नागपुरात आज फडणवीसांचं जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी गोव्या भाजपला टक्कर देण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केलीय.

'गोव्याच्या जनतेनं शिवसेना, राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखवली', फडणवीसांच्या सत्कारावेळी गडकरींची टोलेबाजी
गोव्यातील विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात सत्कार, नितीन गडकरींची उपस्थितीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 6:44 PM

नागपूर : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपला मोठा विजय मिळालाय. 20 जागांसह गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. काही अपक्ष आणि मगोपनेही भाजपला पाठिंबा दिल्यानं गोव्यात पुन्हा भाजप सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट आहे. गोव्यातील भाजपच्या विजयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सिंहाचा वाटा आहे. गोवा भाजप प्रभारी म्हणून फडणवीस यांनी रणनिती आखण्यापासून, उमेदवार निवड ते गल्ली बोळात जाऊन प्रचार करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. अशावेळी नागपुरात आज फडणवीसांचं जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही (Nitin Gadkari) उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी गोव्या भाजपला टक्कर देण्याची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केलीय.

गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा दारूण पराभव झाला. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाली. हाच धागा पकडत नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर हल्ला चढवला. गोव्याच्या जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. गडकरी पुढे म्हणाले की, गोव्यात आम्हाला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालं. मनोहर पर्रिकर असतानाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. भाजपसाठी अनुकूल स्थिती असतानाही आम्हाला स्पष्ट बहुमत मिळत नव्हतं. अशास्थितीत फडणवीस यांची गोव्याच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आणि त्यांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलं. गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं अपशकून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोव्याच्या जनतेनं त्यांचं स्थान काय आहे हे दाखवून दिलं’, अशी टीका गडकरी यांनी केलीय.

गोवा तो झाकी हैं… फडणवीसांचा निर्धार

राज्यात भ्रष्टाचारी सरकारविरोधात सामान्य माणूस भाजपच्या सोबत आहे. राज्यातील सरकार हे महाविकास आघाडी नाही, ही महावसुली आघाडी आहे. सरकारमधील दोन मंत्री जेलमध्ये आहेत. राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाई शिगेला पोहचली आहे. प्रवीण दरेकरांना फसविण्याचा प्रयत्न झाला. तरीही तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणं थांबणार नाही, असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. शेवटी फडणवीस यांनी गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असा निर्धार केला. महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

इतर बातम्या : 

Video – फडणवीस, गडकरी यांनी एकमेकांना भरविला विजयाचा पेढा, नागपुरात दोघांचाही जल्लोषात सत्कार

Sharad Pawar : भाजपला राज्यात पुन्हा येऊ देणार नाही, शरद पवारांची गर्जना; युवा आमदारांनाही कामाला लागण्याचे आदेश

Non Stop LIVE Update
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.