पवारांसमोर गडकरी म्हणाले, साहेब त्याची आम्हाला लाज वाटते, त्यांना वाटते की नाही माहिती नाही!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा झाला. याच सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नितीन गडकरी आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते.

पवारांसमोर गडकरी म्हणाले, साहेब त्याची आम्हाला लाज वाटते, त्यांना वाटते की नाही माहिती नाही!
Nitin Gadkari_Sharad Pawar
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 1:11 PM

अहमदनगर : महाराष्ट्र सरकार ज्या ज्या ठिकाणी जागा देईल त्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या पैशांनी विकास करायला तयार आहोत, असं केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा झाला. याच सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नितीन गडकरी आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते.

एकट्या पुणे जिल्ह्यात , कोल्हापूर जिल्ह्यात जे दूध संकलित होतं तेवढं विदर्भ आणि मराठवाड्यात होत नाही याची आम्हाला लाज वाटली पाहिजे, असं नितीन गडकरी म्हणाले.

नितीन गडकरींनी दूध उत्पादनाबाबतचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, एकदा राज्याचे पशू आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे मदर डेअरिच्या मीटिंगला आले होते. त्यावेळी मी मदर डेअरचे चेअरमन आणि भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला, आमच्याकडे 3 लाख लिटर दूध कलेक्शन होतं, ते 10 लाख लिटर कसं होईल.

त्यानंतर मी सुनील केदार आणि अधिकाऱ्यांसमोर सर्वांना प्रश्न केला, एकट्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जेवढं दूध होतं, तेवढं अख्ख्या विदर्भात होत नाही, याची आम्हाला लाज आणि शरम वाटते, तुम्हाला वाटते की नाही मला माहिती नाही. पण सुनील केदार आणि मला वाटते, म्हणून आपल्याला ग्रामीण भागात, विशेषत: आपल्या भागामध्ये दुधाच्या उत्पादानमुळे शेतकरी संपन्न झाला, समृद्ध झाला. आत्महत्या करत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी काय म्हणाले?

  • गडकरी – आज नगर जिल्ह्यातील अनेक कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे.
  • सुजय विखे म्हणाले की सर्वात जास्त निधी नगर जिल्ह्याला दिला असं म्हणाले पण ज्या जिल्ह्यात आणि राज्यात जातो तिथे सगले जण असंच म्हणतात
  • गरीब गरीब असतो त्याला जात पंथ नसतो, जो गॅस हिंदूला ज्या पैशात मिळतो त्याच पैशात मुस्लिमाला मिळतो
  • गडकरी – महाराष्ट्र सरकार ज्या ज्या ठिकाणी जागा देईल त्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या पैश्यानी विकास करायला तयार आहोत
  • नगर जिल्हयाला विकासाची परंपरा आहे. पहिला साखर कारखाना या जिल्ह्यात तयार झाला 23 कारखाने या जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्याचं विकासात फार मोठं योगदान, आपल्या जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्न कोल्हापूरचं आहे. कारण तिथे साखर कारखाने सर्वाधिक आहेत.
  • गडकरी – येणाऱ्या काळात साखर कारखान्याच्या माध्यमातून होणारा विकास किती मोठा आहे हे आपण जाणतो
  • दुधाच्या माध्यमातून विकास पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांनी केला आहे.
  • मदर डेअरी 3 लाख लिटर दूध कलेक्ट करते ते 10 लाखावर गेलं पाहिजे
  • एकट्या पुणे जिल्ह्यात , कोल्हापूर जिल्ह्यात जे दूध संकलित होतं तेवढं विदर्भ आणि मराठवाड्यात होत नाही याची लाज वाटली पाहिजे
  • गडकरी – गाईना सीमेन्स शंभर रुपयांपेक्षा कमी रुपयात उपलब्ध करून दिल आहे. गाईचं पोट ट्रान्सप्लांट करायचं आणि चांगल्या गाईचं ट्रान्सप्लांट केलं तर दूध वाढू शकतो.
  • गडकरी – कोल्हापूरची साखर कारखाने म्हणजे मेरिटच्या विद्यार्थ्यांची शाळा, मराठवाडा फर्स्ट क्लास विद्यार्थ्यांची शाळा आणि विदर्भ त्यानंतर
  • गडकरी – महाराष्ट्र बद्दल मला नेहमी आस्था आहे आणि मला सतत वाटतं की महाराष्ट्र देशात नंबर एक ला असला पाहिजे
  • गडकरी – महाराष्ट्र त आता इथेनॉल निर्माण केलं पाहिजे, शुगर केन ज्यूस पासून इथेनॉल निर्माण करायला परवानगी दिली आहे. 4500 करोड लिटर इथेनॉल निर्माण झाला जेवढं इथेनॉल निर्माण होईल ते भारत सरकार विकत घेईल
  • गडकरी – इथेनॉल फुयल हे पेट्रोल पेक्षा चांगलं आहे. बाहेर देशात इलेक्ट्रिक आणि इथेनॉल वर गाड्या चालत आहेत. अमेरिका ब्राझील आणि कॅनडा
  • माझा आग्रह आहे ट्रान्सपोर्ट शंभर टक्के इथेनॉल झालं पाहिजे बजाज आणि tvs ने इथेनॉल स्कुटर तयार केल्या आहेत
  • 12 लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करतो. पण आपला शेतकरी इथेनॉल निर्माण करू शकतो. इथेनॉल पंपाना परवानगी मिळाली आहे. मी सुप्रीम कोर्टात अफेडवीत सबमिट केलं आहे. युरो 4 चे नॉर्म आहेत. त्यावर इथेनॉल वापरले तर शंभर टक्के प्रदूषण कमी होऊ शकतो
  • फ्लेक्स इंजिन निर्माण झालं की सगळं इथेनॉल वर सुरू
  • मी नागपुरात 35 बसेस इथेनॉल वर चालवल्या आहेत. ब्राझील मध्ये इथेनॉल वर आहेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी इथेनॉल इंधन निर्माण करतील.
  • आणि 12 लाख कोटी पैकी 5 लाख कोटी शेतकरयांच्या घरात गेले तर कशाला शेतकरी गरीब राहील
  • मी तीन साखर कारखाने चालवतो, कारखाने जिवंत राहिले तर शेतकरी जिवंत राहिला पाहिजे. साखर करखान्याजी शेतकऱ्यांचं शोषण नाही केला पाहिजे
  • आपल्या देशात साखरवची 70 लाख टन साखर जास्त निर्माण केली. हे चक्र उलटं फिरलं तर शेतकरी कारखाने आणि बँका डुबतील साखरेचे रूपांतर इथेनॉल मध्ये करा. असं केल तर साखरेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या निर्माण होणार नाहीत
  • 1 लाख 60 हजार कोटी रुवयांचे खाद्य तेल आयात करतो. उसात खाद्य तेल बिया लावल्या पाहिजेत
  • गडकरी – तीन इथेनॉल पंपाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केलं आहे.
  • गडकरी – आम्ही ब्रिज कमी बंधारे बांधायला सुरू केली आहे. 30 मीटर वरून आम्ही पिलर 120 मीटर वर नेला आहे. त्यामुळे पुलाच्या पिलर ची लांबी वाढली
  • गडकरी – दिलीप गांधी हे नाहीत याची मला सातत्याने अटजावन होत आहे. त्यांनी या कामासाठी खूप चकरा मारल्या
  • गडकरी – लँड अकविजेजेशन चा प्रॉब्लेम या जिल्ह्यात खुप आहे. आणखी लागले तर पैसे देतो पण हा प्रॉब्लेम सोडवावा. सुरत अहमदनगर सोलापूर असा ग्रीनफिल्ड रस्ता तयार करणार आहात, पूर्ण ग्रीनरी रोडच्या बाजूने असणार आहोत
  • सुरत नाशिक अहमदनगर आकाळकोट कळणार बेंगलोर असा हा रस्ता होणार आहे.
  • हा रस्ता अहमदनगर जिल्ह्यातून 180 किलोमीटर जाणार आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा मेन लाईनवर येणार आहे.
  • हा रस्ता 50 हजार कोटी रुपयांचा आहे.
  • आपल्या राज्यात एक एकर जमीन अधिग्रहण करण्यासाठी 18 कोटी रुपये खर्च होता. 18 कोटी देऊन कसे रोड बांधणार, आणि आता तो दर कमी होणार आहे. माझ्या सेक्रेटरी ने पत्र काढलं होतं की 18 कोटी हा दर कमी केल्याशिवाय महाराष्ट्रात विकास कामे होणार नाहीत मी बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलली त्यात आता बदल होत आहे.
  • रस्त्याच्या कडेची जमीन नेत्यांऐवजी सरकारने विकत घेतली पाहिजे म्हणजे तिथे विकास कामे करता येतील त्यामुळे रोजगार उपलब्ध होईल
  • अटलजींच्या काळात पेट्रोल डिझेल वर 50 पैसे सेस लावला आणि त्यातून ग्रामीण भागातील रस्ते झाले
  • मी 1200 कोटी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधीपक्ष आणि अपक्ष यांना वाटले आहेत
  • अहमदनगर ते पुणे माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. या रस्त्याने खूप ट्रॅफिक आहे त्यामुळे वाघोली ते शिरूर या ठिकाणी रस्त्यांची डेव्हलपमेंट करणार आहे
  • एक डबल ब्रिज या रोडवर उभारणार आहे.
  • स्टील आणि खडी यावरची रॉयल्टी सरकारने माफ करावी अशी मी राज्य सरकारला विनंती केली आहे
  • वसई विरार पासून वरळी बांद्रा असं थेट समुद्रातून जोडलं तर 12 तासात मुंबईला जात येऊ शकतो
  • याबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.