रामाला कुणीच हायजॅक करु शकत नाही : दानवे

रामाला कुणीच हायजॅक करु शकत नाही : दानवे

औरंगाबाद : “रामाला कुणी हायजॅक करु शकत नाही, राम हा आम जनतेचा आहे”. असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर केले.

“राम हा काँग्रेसचा नाही, ना भाजपचा, ना शिवसेनेचा तो या देशातील आम जनतेचा आहे”. असेही ते म्हणाले.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. राम मंदिर लवकरात लवकर बांधण्यात यावं यासाठी हा अयोध्या दौरा करण्यात आला. ठाकरेंनी आज सकाळी कुटुंबासह रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली, जिथे त्यांनी या दौऱ्याचा मूळ उद्देश स्पष्ट केला. तसेच त्यांनी भाजपला राम मंदिर बांधण्याचा अल्टिमेटमही दिला.

ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहेत. यावर राजकीय नेते वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच रावसाहेब दानवे यांनी अयोध्या यात्रेवरून शिवसेनेवर निशाणा साधला.

“भाजप लवकरच राम मंदिर बांधेल, त्यासाठी आमचे प्रयत्नही सुरू आहेत. कायदा करण्यासाठी अडचणी येतात, हे खासदार संजय राऊय यांना माहित आहे. राज्यसभेत आमची संख्या नसल्याने विशेष कायदा करण्यास अडथळा येतो आहे. त्यासाठी किमान दोन तृतीयांश संख्या असणे गरजेचे आहे”. असेही दानवे म्हणाले.

“दोन्ही पक्षाने एकत्र आले पाहिजे आणि नक्कीच रामाचे दर्शन घेऊन आल्यावर शिवसेनेत बदल होईल”, असा टोलाही यावेळी दानवेंनी लगावला.

राजकीय वर्तुळात ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवसेनेच्या या दौऱ्यामुळे भाजपाची चांगली गोची झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेमुळे राम मंदिरच्या राजकारणाला एक नवे वळण आले आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI