झाडं तोडण्यावरुन अमृता फडणवीस यांची शिवसेनेवर टीका, शिवसेनेकडून चोख प्रत्युत्तर

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर ट्वीट करत निशाणा साधला (Amruta Fadnavis tweet shivsena) आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:53 PM, 8 Dec 2019

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर ट्वीट करत निशाणा साधला (Amruta Fadnavis tweet shivsena) आहे. “शिवसेना ही ढोंगी आहे. आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीसाठी विरोध करतात,” असं ट्वीट करत अमृता फडणवीस (Amruta Fadnavis tweet shivsena) यांनी शिवसेनेवर आरोप केले आहेत.

औरंगाबाद येथे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडं कापण्यात येणार आहेत, अशा आशयाची बातमी एका वृत्तपत्रात छापून आली आहे. या बातमीचा फोटो अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला.

“शिवसेना ही ढोंगी आहे. आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीला विरोध करतात. तसेच शिवसेना कमिशनखोरी आहे. त्यांचा ढोंगीपणाचा आजार लवकर बरा होईल,” असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले (Amruta Fadnavis tweet shivsena) आहे.

शिवसेनेकडून चोख प्रत्युत्तर

“अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटमध्ये काही तथ्य नाही. औरंगाबादचे महापौर यांनी स्पष्ट केलं आहे की, “आम्ही कोणतेही झाड कापणार नाही,” असं शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले.

“बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आम्ही एकही झाड न तोडता हे स्मारक कसं होईल. त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहे,” असं स्पष्टीकरण औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी (Amruta Fadnavis tweet shivsena) दिले.

नेमकं प्रकरण काय?

भाजप सरकार गेल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने मिळून सत्तास्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी झाडांच्या तोडकामावर स्थगिती आणली. यानंतर सर्वांचे लक्ष औरंगाबादमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकडे लागले होते. कारण या स्मारकासाठी शिवसेना अनेक झाडांची कत्तल करणार असल्याचे बोललं जात होते. तशा चर्चाही सुरु होत्या.

दरम्यान, नुकतंच काही महिन्यांपूर्वी गोरेगाव आरे कॉलनितील झाडांची कत्तल करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजप सरकारवर टीका करण्यात आली होती. त्यासोबतच शिवसेनेनेही रस्त्यावर उतरत या कत्तलीला विरोध दर्शविला होता. याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा (Amruta Fadnavis tweet shivsena) साधला.