‘ती’ मागणी निरर्थक, शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही; संजय राऊतांचं ट्विट

मुंबईतल्या एका दुकानाला असलेलं कराची बेकरी हे नाव बदलण्यासाठी एका शिवसेना नेत्याने दुकानदाराला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला असला तरी शिवसेनेने मात्र ती आपली अधिकृत भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं आहे. (Sanjay Raut on Karachi Sweets row)

'ती' मागणी निरर्थक, शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही; संजय राऊतांचं ट्विट

मुंबई: मुंबईतल्या एका दुकानाला असलेलं कराची बेकरी हे नाव बदलण्यासाठी एका शिवसेना नेत्याने दुकानदाराला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला असला तरी शिवसेनेने मात्र ती आपली अधिकृत भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवरून पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करून कराची बेकरीच्या वादातून अंग झटकले आहे. (Sanjay Raut on Karachi Sweets row)

कराची बेकरी आणि कराची स्वीटस 60 वर्षापासून मुंबईसह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी आणि पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे प्रकरण

शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी वांद्रे येथील कराची स्वीट्स या दुकानाचं नाव पाहून त्या दुकानदाराला दुकानाचं नाव बदलण्यास सांगितलं असून या दुकानदाराला दुकानाची पाटी बदलण्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला. मला कराची या नावाबद्दल आक्षेप आहे. एकीकडे भाऊबीज होते आणि दुसरीकडे आपला जवान शहीद होतो. त्यात पाकिस्तानच्या कराचीचे नाव दुकानाला असेल तर मनाला वेदना होतात. या वेदना असह्य आहेत. तुम्हाला वाटत असेल तुमच्या भावना असतील तर कराची नाव तुमच्या हृदयात ठेवा. त्याचे प्रदर्शन नको”, असं या दुकानदाराला सांगितल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं.

दिवाळी निमित्त मिठाई घेण्यासाठी दुकानात गेलो होतो. माझ्या खास कार्यकर्त्याचा वाढदिवससुद्धा होता. त्यावेळी कराची स्वीट्सचे दुकान दिसलं. मी चौकशी केली की हे दुकान कुणाचं आहे? दुकानाचे नाव कराची का? त्या मालकाने सांगितलं, फाळणीवेळी आम्ही इथे आलो. या नावासोबत आमच्या भावना आहेत. मग भारताबद्दल भावना किंवा अभिमान नाही का? असं मी त्यांना विचारलं. त्यावर मालक म्हणाले, आहेत ना! मी म्हटलं, तुम्हाला मुंबईने मोठं केलं. मग मुंबईचं गुणगाण गायलेलं चालत नाही का? पहिले आपला देश”, असं दुकानदाराला सांगितल्यानंतर त्यांनाही माझी भूमिका पटली. त्यामुळे त्यांनी दुकानाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचंही नांदगावकर यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

15 दिवसात मुंबईतील कराची बेकरीचं नाव बदला, नितीन नांदगावकरांचा इशारा

Mumbai Malls | मुंबईतील मॉल्सची झाडाझडती, 29 मॉल्सना कारवाईचा इशारा, वाचा संपूर्ण यादी

शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यास 50 टक्के वीजबिल माफी, ठाकरे सरकारचा निर्णय

(Sanjay Raut on Karachi Sweets row)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI