आता अमित शाहांना हिंदुत्वविरोधी म्हणणार का? संजय राऊतांचा भाजपला खडा सवाल

केरळमध्ये तिसरी लाट येत आहे. महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने उघडलं जात आहे. मात्र काही राजकीय पक्ष आहेत ज्यांना बेस नाही, ते नियम पाळत नाहीत. ही बंधनं केंद्राने घातली आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

आता अमित शाहांना हिंदुत्वविरोधी म्हणणार का? संजय राऊतांचा भाजपला खडा सवाल
Sanjay raut And Amit Shaha
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 12:19 PM

मुंबई : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona Third wave) उंबरठ्यावर आहे. मात्र भाजपवाले मंदिरं उघडण्यासाठी (Temple reopen ) आंदोलनं करत आहेत. पण काळजी घेण्याचं आवाहन, नियमावली केंद्राने पाठवली आहे. जर भाजप नेत्यांवर कारवाई केली तर हे आम्हाला हिंदुत्वविरोधी ठरवतील. आता अमित शाहांच्या गृहखात्याने नियमावली जारी केली आहे, त्यांनाही तुम्ही हिंदुत्वविरोधी ठरवणार का असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत काय म्हणाले?

नोटीस येत आहेत, त्याबाबत राजकीय दबाव आहे. एका पक्षाचे, भाजपचे नेते सोशल मीडियावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची यादी जाहीर करत आहेत, यांना ईडी बोलवणार. हे ईडीचं समन्स आहे की भाजपचं हा संभ्रम आहे. भाजपचे प्रमुख लोक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या १० लोकांची यादी जाहीर केली, भाजपचे लोक ईडी कार्यालयात बसले की ईडीचे लोक भाजप कार्यालयात हे शोधण्याची गरज.

अनिल परब यांना ईडी नोटीस आली, मात्र ते आज जाणार नाहीत. ईडी काय करतेय, सीबीआय काय करतेय? कुणाला वॉरंट जातंय, कुणाची संपत्ती जप्त होतेय, याची यादी भाजपवाले सोशल मीडियावर टाकत आहेत. ईडी भाजप चालवतेय का भाजपला ईडी चालवतेय?

आम्हाला फक्त डिफेन्सचं रडार माहिती आहे

आम्हाला फक्त डिफेन्सचं रडार माहिती आहे, देशाच्या शत्रूवर हल्ले केले जातात. ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आम्ही असेल तर ते आम्हाला देशाचे दुष्मन मानतात का, लावा रडार आमच्यावर .

ठाण्यात फेरीवाल्याने जे केले ते दुर्दैवी आहे, त्यावर कडक कारवाई राज्य सरकार करत आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे.

केरळमध्ये तिसरी लाट येत आहे. महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने उघडलं जात आहे. मात्र काही राजकीय पक्ष आहेत ज्यांना बेस नाही, ते नियम पाळत नाहीत. ही बंधनं केंद्राने घातली आहेत. दहीहंडी आणि गणेशोत्सवावर काळजी घेणं आवश्यक आहे असे केंद्राने सांगितलं. महाराष्ट्र तिसऱ्या लाटेवर आहे.

केंद्र सरकार अॅक्शन घेणार का?

भाजपवाले मंदिरासाठी आंदोलन करत आहे, यावर केंद्र सरकार अॅक्शन घेणार का? आम्ही घेतली तर हिंदुत्वविरोधी म्हणाल. केंद्राने नियमावली दिली, गृहमंत्री अमित शाहांच्या खात्याने दाखवली आहे, अमित शाह हिंदुत्वविरोधी आहेत का? केंद्र सरकारचे नियम पाळत नाही, मग केंद्र सरकारही हिंदुत्वविरोधी आहे का?  असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले.

VIDEO : संजय राऊत यांचा हल्लाबोल

संबंधित बातम्या 

तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष, राज ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका

Anil Parab : अनिल परब यांना तिसरा धक्का, आता राज्यपालांच्या आदेशाने लोकायुक्तांकडून चौकशी

Non Stop LIVE Update
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.