नवनीत राणांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, रणी राणा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

नवनीत राणांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, रणी राणा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

ऐन दिवाळीदिवशी बडनेराचे आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांच्या दोघांमध्ये चांगलाच राडा (Ravi Rana and dinesh Boob fighting) झाला.

Namrata Patil

|

Oct 27, 2019 | 3:04 PM

अमरावती : ऐन दिवाळीदिवशी बडनेराचे आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांच्या दोघांमध्ये चांगलाच राडा (Ravi Rana and dinesh Boob fighting) झाला. खासदार नवनीत राणा यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्याने हा वाद निर्माण झाला आहे. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामुळे वृद्धाश्रमातील वृद्धांना त्रास झाला (Ravi Rana and dinesh Boob fighting) आहे.

दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी राज्यात अनेक ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. नुकतंच अमरावतीतील बडनेराजवळील मधूबन वृद्धाश्रममध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिनेश बुब यांनी कार्यक्रमापूर्वी नवनीत राणा यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे संतापलेल्या राणा आणि बुब यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्रमापूर्वी शाब्दिक वाद झाला. शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा राणा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

दरम्यान घडलेल्या या सर्व प्रकारामुळे वृद्धाश्रमासह  परिसरातील लोक संतापलेली असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच घडलेल्या या प्रकारामुळे वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

“मी गेल्या 15 वर्षांपासून अमरातीतील मधूबन वृद्धाश्रम या ठिकाणी जाऊन दिवाळी साजरी करतो. त्यावेळी त्यांना फटाके, फराळे, पणत्या, रांगोळी हे सर्व त्यांना देतो. आजही दिवाळीच्या निमित्ताने मी वृद्धाश्रमात गेलो होतो. मात्र त्यावेळी तिथे आलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या कार्यकर्त्यांना महिलांविरुद्ध अपशब्द वापरले,” असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

तर दिनेश बुब यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. “मी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांच्या विषयी कोणतेही अपशब्द काढलेले नाही,” असेही ते म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें