“आमची महापालिका निवडणुकीची प्रचंड तयारी, राज ठाकरेंचे लवकरच झंझावाती दौरे”

येत्या महापालिकांसाठी मनसेची प्रचंड तयारी झाली आहे. कोरोना काळानंतर राज ठाकरे यांचे झंझावाती दौरे सुरु होतील, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

"आमची महापालिका निवडणुकीची प्रचंड तयारी, राज ठाकरेंचे लवकरच झंझावाती दौरे"
Raj Thackeray Painting


अक्षय कुडकेलवार, टीव्ही 9 मराठी,  मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे नेत्यांनी समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांच्या हस्ते मुंबईतील लसीकरण उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाळा नांदगावकर यांनी मनसे (MNS) आणि राज ठाकरे यांची पुढील रणनीती सांगितली. येत्या महापालिकांसाठी मनसेची प्रचंड तयारी झाली आहे. कोरोना काळानंतर राज ठाकरे यांचे झंझावाती दौरे सुरु होतील, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Our preparations for municipal elections are huge, Raj Thackerays Maharashtra duara soon said MNS leader Bala Nandgaonkar)

बाळा नांदगावकर म्हणाले, “वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जनतेला कशात आनंद आहे ते करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. लसीकरणाचा उपक्रम राबवणाऱ्यांचे स्वागत करतो. राज ठाकरेंना महाराष्ट्राबद्दल, देशाबद्दल कळकळ आहे. येत्या महानगर पालिका आणि इतर निवडणुकांची प्रचंड तयारी झाली आहे. कोरोनाकाळ संपल्यानंतर राज ठाकरे बाहेर पडतील”

चिंतन-मनन सुरु असतं

राज ठाकरे यांचं चिंतन-मनन सुरु असतं, महाराष्ट्रप्रती, लोकांप्रती समस्यांचं चिंतन मनन सुरु आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्राची ब्लू प्रिंट 2014 ला अर्पण केली. तब्बल 8 वर्ष अभ्यास करुन त्यांनी महाराष्ट्राप्रती व्हिजन मांडलं. महाराष्ट्राप्रती कोणतीही तडजोड नाही, पक्ष स्थापन केला त्यावेळी त्यांनी स्वत:ला महाराष्ट्राला अर्पण केलं, येणाऱ्या निवडणुकांसाठी प्रचंड तयारी केली आहे. कोविडमुळे थोडे थांबलेत, ते जिथे जातील तिथे गर्दी होते. त्यामुळे ते बाहेर पडले नाहीत. मात्र कोव्हिड काळानंतर त्यांचा झंझावाती दौरा सुरु होईल, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

VIDEO : बाळा नांदगावकर काय म्हणाले? 

राज ठाकरे यांचं आवाहन 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून मनसे कार्यकर्त्यांना वाढदिवसाला भेटीसाठी न येता घरीच राहण्याचं आवाहन केलं होतं. चार दिवसापूर्वी त्यांनी पत्रक प्रसिद्ध केलं होतं. आज  14 जून रोजी राज यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे वाढदिवशी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये म्हणून राज यांनी हे आवाहन केलं आहे. हे आवाहन करताना त्यांनी मनसे सैनिकांना राज्यातील कोरोना परिस्थिती आणि कोरोनामुळे होणाऱ्या धोक्याची सूचना देऊन काळजी घेण्याचं कळकळीचं आवाहनही केलं आहे.

संबंधित बातम्या

या वातावरणात वाढदिवस साजरा करणं पटत नाही, माझ्या भेटीसाठी येऊ नका, तुमच्या घरीच राहा: राज ठाकरे 

(Our preparations for municipal elections are huge, Raj Thackerays Maharashtra duara soon said MNS leader Bala Nandgaonkar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI