AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrakant Patil : रोहिणी खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना का पाठवले बदाम? VIDEO

Chandrakant Patil : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मिश्किल टिप्पणी केली. राज्यातील एका महिला नेत्याने त्यांना केलेल्या घोषणेची आठवण करुन दिली. 'मी कोल्हापूरचा माणूस आहे. मला बदामाची आवश्यकता नाही' असं त्यांनी सांगितलं.

Chandrakant Patil : रोहिणी खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना का पाठवले बदाम? VIDEO
Rohini Khadse-Chandrakant Patil
| Updated on: Jun 26, 2024 | 3:37 PM
Share

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना एका महिला नेत्याने त्यांच्या घोषणेची आठवण करुन दिली. त्यांना बदाम पाठवले आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ‘मी कोल्हापुरचा माणूस आहे. मला बदामाची आवश्यकता नाही’ असं म्हटलय. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना बदाम पाठवले. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आहेत. रोहिणी खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना, मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची आठवण करुन दिली.

“महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षण देणार अशी घोषणा केली होती. त्या घोषणेची आपल्याला आठवण व्हावी यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी तुम्हाला बदाम पाठवतोय. कारण आपण स्वत: घोषणा केली आहे. आता मुलींच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे. माझ्या सगळ्या मुली शासन आदेश निर्गमित व्हावा, उच्च शिक्षण मोफत केलं जाणार त्याची वाट बघतोय. दादा हे बदाम खावेत, त्या घोषणेची आठवण व्हावी, एवढची माफक अपेक्षा आहे” असं रोहिणी खडसे म्हणाल्या. त्या कन्फ्यूज झाल्या असतील

त्यावर आपल्या नेहमीच्या शैलीत चंद्रकांत पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केली. “रोहिणी खडसे माझ्यामध्ये आणि अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये कन्फ्यूज झाल्या असतील. ते चंद्रकांत पाटील त्यांच्या तालुक्यातील मुक्ताई नगरचे आहेत. त्यांच्यासाठी हे बदाम असावेत” असं चंद्रकांत पाटील यांनी सुचवलं. ‘मी कोल्हापूरचा माणूस आहे. मला बदामाची आवश्यकता नाही’ असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा