Prajwal Revanna : सेक्स टेप मुद्यावरुन अमित शाह यांचा प्रियंका गांधींवर हल्लाबोल, ‘मग कारवाई का नाही केली?’

Prajwal Revanna : "भाजपाच्या अंतर्गत सर्वेनुसार दोन टप्प्यात भाजपा आणि सहकारी पक्ष मिळून 100 जागांच्या पुढे गेले आहेत" असा दावा अमित शाह यांनी केला. "जनतेचा आशिर्वाद आणि समर्थनाच्या बळावर आमची 400 पार लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे" असं अमित शाह म्हणाले.

Prajwal Revanna : सेक्स टेप मुद्यावरुन अमित शाह यांचा प्रियंका गांधींवर हल्लाबोल, 'मग कारवाई का नाही केली?'
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 2:33 PM

केंद्रीय गृह मंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शाह यांनी आसाम गुवाहाटीमध्ये मंगळवारी एका प्रेस कॉन्फ्रेंसला संबोधित केलं. यावेळी त्यांनी प्रज्वल रेवन्ना प्रकरणावरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला. “हे सहन केलं जाऊ शकत नाही, भाजपा देशातील मातृशक्ती सोबत आहे. हा अपमान मान्य नाही. पण कर्नाटकात सरकार कोणाच आहे? काँग्रेस सरकारने आतापर्यंत कारवाई का नाही केली? प्रियंका गांधी यांनी आपल्या सरकारला प्रश्न विचारावा, कारवाई का नाही झाली?” असं अमित शाह म्हणाले. जेडीएसने आज प्रज्वल रेवन्ना विरोधात पाऊल उचललय. घरकाम करणाऱ्या एका महिलेने JDS खासदार प्रज्वल रेवन्नावर गंभीर आरोप केले आहेत. प्रज्वल रेवन्नाचे कथित व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेत. कथित अश्लील व्हिडिओच्या तपासासाठी SIT ची स्थापना करण्यात आलीय.

‘आरक्षण संपवण्याचा काँग्रेसचा आरोप तथ्यहीन आणि आधारहीन आहे’ असं अमित शाह म्हणाले. लोकसभेची निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. त्यात दोन टप्प्यांच मतदान पार पडलय. “भाजपाच्या अंतर्गत सर्वेनुसार दोन टप्प्यात भाजपा आणि सहकारी पक्ष मिळून 100 जागांच्या पुढे गेले आहेत” असा दावा अमित शाह यांनी केला. “जनतेचा आशिर्वाद आणि समर्थनाच्या बळावर आमची 400 पार लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे” असं अमित शाह म्हणाले.

देशाच संविधान बदलण्याच्या आरोपावर अमित शाह काय म्हणाले?

“आसाम, बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, उत्तराखंड आदि सर्व राज्यात मोठ यश मिळतय” असं अमित शाह म्हणाले. “दक्षिण भारतात भाजपाला चांगला प्रतिसाद मिळतोय. काँग्रेसकडून आमच्या 400 पार लक्ष्याचा दावा ट्वीस्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपा 400 पार गेल्यानंतर देशाच संविधान बदलणार, आरक्षण संपवणार असा काँग्रेसकडून प्रचार सुरु आहे. या दोन्ही गोष्टी निराधार आणि तथ्यहीन आहेत” असं अमित शाह म्हणाले.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.