AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kashinath Choudhary : पालघर साधू हत्याकांडात नाव तरी भाजपत प्रवेश, या वादावर आज काशिनाथ चौधरींनी काय स्पष्टीकरण दिलं?

Kashinath Choudhary : पालघर गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात भाजपाने आरोप केलेले काशिनाथ चौधरी यांचा परवा भाजपात पक्षप्रवेश झाला होता. काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशावरून विरोधी पक्षांनी भाजपाला टार्गेट केलं. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी चौधरी यांच्या पक्षप्रवेशावर स्थगिती आणली होती. आज काशिनाथ चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

Kashinath Choudhary : पालघर साधू हत्याकांडात नाव तरी भाजपत प्रवेश, या वादावर आज काशिनाथ चौधरींनी काय स्पष्टीकरण दिलं?
Kashinath Choudhary
| Updated on: Nov 18, 2025 | 12:04 PM
Share

पाच वर्षांपूर्वी पालघरमध्ये दोन साधुंची हत्या झाली होती. जमावाने मिळून ही हत्या केली होती. या प्रकरणात भाजपने ज्या नेत्यावर आरोप केले होते, त्यालाच आता पक्षात प्रवेश दिला. यावरुन विरोधी पक्षांनी कोंडीत पकडल्यानंतर भाजपने त्यांच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली. या प्रकरणात भाजपने त्यावेळी काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले होते. त्या काशिनाथ चौधरींना पक्षात प्रवेश देऊन भाजपने आता यू-टर्न मारला आहे. काशिनाथ चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. “दोन दिवसांपूर्वी माझा भाजपा पक्षप्रवेश झाला. पण पाच वर्षापूर्वी साधू हत्याकांडाशी माझा संबंध जोडला गेला. या प्रकरणात मी साक्षीदार आहे. सरकारने मला सरकारने संरक्षण दिले आहे. या प्रकरणात माझी प्रतिमा मलिन झाली आहे. कालपासून माझं कुटुंब मानसिक तणावाखाली आहे. ते रडतायत. मी फक्त मदत करायला गेलो होतो. माझा मुलगा व्याकुळ आहे” असं काशिनाथ चौधरी म्हणाले.

“माझ्या कुटुंबाला त्रास होतोय. माझी मुलं रडतायत. या राजकारणासाठी माझी राजकीय कारकीर्द संपवायला निघालेत” असं काशिनाथ चौधरी म्हणाले. या प्रकरणात पोलिसांच्या विनंतीवरुन मी वाचवायला गेलो होतो, असं ते म्हणाले. “दोन दिवसांपूर्वी माझा भाजपा पक्ष प्रवेश झाला होता. या पक्षप्रवेशानंतर पाच वर्षापूर्वी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांडाशी माझा संबंध जोडण्यात आला. या सर्व प्रकरणात मी फक्त साक्षीदार आहे .सरकारने मला संरक्षण सुद्धा दिले आहे” असं काशिनाथ चौधरी यांनी सांगितलं.

राजकारणामुळे माझं कुटुंब भरडलं जातय

“या प्रकरणाशी माझा काहीही संबध नाही. त्याठिकाणी पोलिसांच्या सांगण्यावरून मी फक्त मदत करण्यासाठी गेलो होतो. या प्रकरणात माझी प्रतिमा मलिन केली जात आहे. काल पासून मी आणि माझं कुटुंब प्रचंड मानसिक तणावात आहे. मी फक्त मदत करायला गेलो होतो. या प्रकरणाशी माझा संबध जोडून वारंवार मला प्रसार माध्यमांमध्ये दाखवलं जात आहे. त्यामुळे माझी मुलगी, मुलगा खूप तणावात आहेत. राजकारणामुळे माझं कुटुंब भरडलं जात आहे” असं काशिनाथ चौधरी म्हणाले.

भाजपत प्रवेश कसा झाला?

“जिल्ह्यातील भाजपाच्या स्थानिक पुढाऱ्यांसोबत चर्चा होऊन माझा भाजपा पक्ष प्रवेश झाला होता. यावेळी कोणतेही आश्वासन दिले नव्हते. मी एक फक्त कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. गडचिंचले प्रकरणात माझ्या सर्व चौकश्या झाल्या आहेत. मी कुठेही आरोपी नाही तर या घटनेचा साक्षीदार आहे” असा दावा त्यांनी केला.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत