पंढरपूर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भगीरथ भालकेंचे पुनर्वसन, दत्तामामांकडून नियुक्ती

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला.

पंढरपूर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भगीरथ भालकेंचे पुनर्वसन, दत्तामामांकडून नियुक्ती
दत्ता भरणे, भगीरथ भालके
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 2:54 PM

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील (Pandharpur by poll results) पराभवानंतर राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन सदस्यपदी भालकेंची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा पदे राष्ट्रवादीकडे, तर चार शिवसेना आणि चार काँग्रेसकडे सोपवण्यात आली आहेत. सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे (Dattatray Bharane) यांनी नियुक्त्या केल्या. मात्र त्यामुळे राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते नाराज असल्याची चर्चा आहे. (Pandharpur by poll defeated NCP candidate Bhagirath Bhalke gets District Planning committee by Datta Bharane)

पंढरपूर पोटनिवडणुकीत पराभव

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपच्या समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे सुपुत्र भगीरथ भालकेंना राष्ट्रवादीने तिकीट दिलं होतं. राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे 3733 मतांनी विजयी झाले.

भारतनानांचा वारसा भगीरथाच्या हाती

भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. त्यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व 18 संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावाला पसंती दिली होती.

पवारांनी संधी दिली, संचालकांनी विश्वास दाखवला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जेव्हा भालके कुटुंबियांना भेटण्यासाठी सरकोलीला गेले होते, तेव्हाच पवारांनी भगीरथ भालके यांना संधी देण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वच संचालकांनी भगीरथ भालके यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची बिनविरोध निवड केली होती.

भगीरथ भालके हे गेल्या दहा वर्षांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात काम करत आहेत. साखर कारखाना अडचणींतून बाहेर काढण्याची जबाबदारी भगीरथ भालकेंवर आहे.

कोण आहेत भगीरथ भालके?

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र भारत भालकेंच्या निधनानंतर रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी भाजप उमेदवार समाधान आवताडेंकडून भगीरथ भालकेंचा पराभव पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा दहा वर्षांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात कामाचा अनुभव

संबंधित बातम्या 

जी सीट बापानं तीनदा जिंकली, ती पोराला का जिंकता आली नाही? भगीरथ भालकेंच्या पराभवाची 5 कारणं

Video: आवताडेची लीड वाढली आणि फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल !

(Pandharpur by poll defeated NCP candidate Bhagirath Bhalke gets District Planning committee by Datta Bharane)

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.