भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी? पंकजा मुंडे म्हणतात...

अहमदनगर : भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता भाजपचं प्रदेशाध्यक्षपद कुणाकडे याची उत्सुकता वाढली आहे. यामध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचंही नाव आहे. यावर स्वतः पंकजा मुंडेंनीच प्रतिक्रिया दिली. माझ्या नावाची चर्चा माध्यमांमधूनच मी ऐकली आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती सांभाळू, असं …

, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी? पंकजा मुंडे म्हणतात…

अहमदनगर : भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता भाजपचं प्रदेशाध्यक्षपद कुणाकडे याची उत्सुकता वाढली आहे. यामध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचंही नाव आहे. यावर स्वतः पंकजा मुंडेंनीच प्रतिक्रिया दिली. माझ्या नावाची चर्चा माध्यमांमधूनच मी ऐकली आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती सांभाळू, असं सांगत त्यांनी रावसाहेब दानवे यांना शुभेच्छाही दिल्या.

रावसाहेब दानवे यांचा 2014 मध्येही मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होता. मात्र त्यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची धुरा दिल्याने त्यावेळी मंत्रिपद सोडावं लागलं होतं. आता पुन्हा दानवेंची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपकडून प्रामुख्याने चार नावं या शर्यतीत आहेत.  यामध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा समावेश आहे.

गिरीश महाजन यांची कारकीर्द पाहता त्यांचं नाव आघाडीवर आहे. संघटन बांधणी असो किंवा अन्य पक्षांची तडजोड, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांमध्ये त्यांनी बजावलेली भूमिका पाहता महाजन यांचं नाव आघाडीवर आहे.

दुसरीकडे सुभाष देशमुख हे मराठा चेहरा आणि भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मंत्रिमंडळात समावेश न करता त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष पद दिलं जाऊ शकतं.

पंकजा मुंडे सध्या राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्याकडे ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी आहे. महाराष्ट्र विधानसभेअगोदर त्यांनी संघर्ष यात्रा काढून वाचावरण ढवळून काढलं होतं. संघटनावर पकड मजबूत असल्याने त्यांचं नावही आघाडीवर मानलं जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *