AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pappu Yadav : माजी खासदार पप्पू यादव यांना अटक, अॅम्ब्युलन्स राड्याप्रकरणी कारवाई

बिहारमधील मधेपुरा लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि जन अधिकार पार्टीचे नेते पप्पू यादव (Pappu yadav arrested in Patna) यांना अटक करण्यात आली आहे.

Pappu Yadav : माजी खासदार पप्पू यादव यांना अटक, अॅम्ब्युलन्स राड्याप्रकरणी कारवाई
Pappu Yadav
| Updated on: May 11, 2021 | 11:46 AM
Share

पाटणा : बिहारमधील मधेपुरा लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि जन अधिकार पार्टीचे नेते पप्पू यादव (Pappu yadav arrested in Patna) यांना अटक करण्यात आली आहे. पाटणा पोलिसांनी (Patna Police) ही कारवाई केलीय. पप्पू यादवविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पप्पू यादव यांनी भाजप खासदार राजीव प्रताप रुडी (BJP MP Rajeev Pratap Rudy) यांच्या गावाजवळ डझनभर अॅम्ब्युलन्स (Bihar Ambulance Controversy) पकडल्या होत्या. खासदार निधीतून या सर्व अॅम्ब्युलन्स खरेदी केल्या होत्या. पप्पू यादव यांच्यावर सरकारी संपत्तीचं नुकसान करणं आणि कोव्हिड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

मला अटक केलं आहे : पप्पू यादव यांचं ट्विट

पप्पू यादव यांनी स्वत: ट्विट करुन आपल्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईची माहिती दिली. “मला अटक करुन पाटण्यातील गांधी मैदान पोलीस स्टेशनला नेलं आहे”, असं ट्विट पप्पू यादव यांनी केलं.

पप्पू यादव यांचं ट्विट 

दरम्यान, पप्पू यादव यांनी आजच आणखी एक ट्विट केलं होतं. “कोरोना काळात जर जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून मदत करणं गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री साहेब मला फाशी द्या किंवा जेलमध्ये पाठवा. झुकणार नाही, थांबणार नाही. लोकांना वाचवणार, बेईमानांचा पर्दाफाश करणार”, असं पप्पू यादव म्हणाले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पप्पू यादव यांच्यावरी आरोपानुसार, त्यांनी लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करत, अमनौर इथे जाऊन, विश्वप्रभा केंद्राबाहेर उभ्या असलेल्या अॅम्ब्युलन्सची पाहणी केली होती. FIR नुसार पप्पू यादव उर्फ राजेश रंजन 7 मे रोजी आपल्या कार्यकर्त्यांसह अॅम्ब्युलन्स पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कोरना नियमांचं उल्लंघन केलं. इतकंच नाही तर त्यांनी अॅम्ब्युलन्सची तोडफोड केल्याचाही आरोप आहे.

दरम्यान, पप्पू यादव यांनी अचानक भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या गावी धाड टाकली होती. तिथे डझनभर अॅम्ब्युलन्स उभ्या असल्याचं दिसलं. लोकांना रुग्णालयात जाण्यासाठी अॅम्ब्युलन्स मिळत नसताना, इतक्या अॅम्ब्युलन्स उभ्या असल्याने पप्पू यादव यांनी राडा केला होता. या अॅम्ब्युलन्स खासदार निधीतून खरेदी केल्या होत्या. त्यातून काही प्रश्न उपस्थित होत आहेत.

पप्पू यादवच्या आरोपांवर राजीव प्रताप रुडी यांनी उत्तर दिलंय. ड्रायव्हर उपलब्ध नसल्याने या अॅम्ब्युलन्स इथे उभ्या असल्याचं रुडी म्हणाले. यानंतर पप्पू यादव यांनी ट्विट करत, एका दिवसात मी सर्व अॅम्ब्युलन्सवर ड्रायव्हरची व्यवस्था करु शकतो असं म्हटलं होतं.

कोण आहेत पप्पू यादव?

राजेश रंजन उर्फ पप्पू यादव हे माजी खासदार आहेत

बिहारमधील डॅशिंग राजकारणी अशी त्यांची ओळख आहे

ते जन अधिकार पक्षाचे अध्यक्ष आहेत

पप्पू यादव यांनी पहिली निवडणूक बिनविरोध लढून जिंकली होती

त्यानंतर त्यांनी सपा आणि मग राजदमधून निवडणूक लढली

पप्पू यादव यांनी 2015 मध्ये जन अधिकार पक्षाची स्थापना केली

पप्पू यादव हे 1991, 1996, 1999, 2004 आणि 2014 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली

पप्पू यादव यांचा 2020 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला

संबंधित बातम्या 

Bihar Election ! हवा निर्माण करण्यात यशस्वी, तरीही पराभूत; बिहार निवडणुकीतील चर्चित चेहरे!

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.