AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गजानन किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश, राऊतांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, कीर्तिकरांना लोक उद्यापासून…

संकटात जे पक्षासोबत राहतात त्याला निष्ठा म्हणतात. कीर्तिकरांसारखे नेते सर्व काही प्राप्त करून भोगून निघून जातात तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी वेगळी भावना निर्माण होते.

गजानन किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश, राऊतांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, कीर्तिकरांना लोक उद्यापासून...
गजानन किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश, राऊतांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, कीर्तिकरांना लोक उद्यापासून...Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 12, 2022 | 11:01 AM
Share

मुंबई: खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा धक्का वगैरे काही नसल्याचं स्पष्ट केलं. कीर्तिकर पक्षातून गेल्याने फार मोठी सळसळ झाली नाही. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील, असं संजय राऊत म्हणाले. तसेच निष्ठा म्हणजे काय? मी तर पक्षासाठी तुरुंगात जाऊन आलो. अजून काय निष्ठा हवी? असा सवालही राऊत यांनी केला.

गजानन कीर्तिकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षाने त्यांना काय दिलं नाही? पाचवेळा आमदार राहिले. दोन्ही मंत्रिमंडळात मंत्री राहिले. दोनवेळा खासदार राहिले, असं सांगत संजय राऊत यांनी कीर्तिकर यांना दिलेल्या पदांची जंत्रीच वाचून दाखवली.

कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर शिवसेनेसोबत आहेत. अमोल हे कट्टर शिवसैनिक आहेत. उम्र की पडाव की बात है. आणखी काही नाही. अमोलने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकले नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

न्यायाची व्याख्या काय? मला तर चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकलं. तरीही मी पक्षात आहे. संकटात जे पक्षासोबत राहतात त्याला निष्ठा म्हणतात. कीर्तिकरांसारखे नेते सर्व काही प्राप्त करून भोगून निघून जातात तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी वेगळी भावना निर्माण होते. फार फार मोठी सळसळ झाली असं काही नाही. गेले ठिक आहे. उद्यापासून लोकं त्यांना विसरून जातील, असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात शिवशाही राबवतील असं विधान कीर्तिकर यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. ती काही अमृतवाणी नाही. शिववाणी नाही.

आपण गेलात. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं. कीर्तिकर गेल्याने पक्षाला काहीच धक्का बसलेला नाही. पुन्हा निवडून यायचं आहे ना त्यांना. किती येतात ते पाहू, असं आव्हानही त्यांनी दिलं.

आमची दिशा योग्य आहे की नाही हे जनता ठरवेल. अंधेरीच्या निवडणुकीत पाहिलं, दिशा कोणती योग्य आहे ते दिसलं. याच परिस्थितीत आमचं चिन्हं गेलं आणि पक्षाचं नाव गेलं. तरीही 68 हजार मते पडली. लोकांनी मतं दिली. ही दिशा योग्यच आहे. आता मशाल, उद्धव ठाकरे आणि शिवसेना पुढे जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय चुकीचा होता, असा दावा कीर्तिकर यांनी केला. त्यावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. राजकारणात अनेक निर्णय घ्यावे लागतात. ते आम्ही घेतले, असं ते म्हणाले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?