पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला घरचा आहेर, लाचखोरांना पाठीशी घातलं जात असल्याचा नगरसेविकेचा आरोप!

| Updated on: Sep 23, 2021 | 9:22 PM

15 दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांच्या बोर्डावर आणि अभियंत्याच्या खुर्चीवर शाफी फेकल्याप्रकरणी शेडगे आणि त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात आली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी आज भाजपवर तोंडसुख घेतलं.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला घरचा आहेर, लाचखोरांना पाठीशी घातलं जात असल्याचा नगरसेविकेचा आरोप!
भाजप नगरसेविका आशा शेडगे यांचा भाजपला घरचा आहेर
Follow us on

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्ष हा लाचखोर स्थायी समिती अध्यक्षांच्या पाठीशी उभा राहत आहे. मात्र, जनतेसाठी तुरुंगवास भोगताना केलेल्या आंदोलनाला निंदनीय संबोधलं जातं, अशा शब्दात पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेविका आशा शेगडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. 15 दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांच्या बोर्डावर आणि अभियंत्याच्या खुर्चीवर शाफी फेकल्याप्रकरणी शेडगे आणि त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात आली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी आज भाजपवर तोंडसुख घेतलं. (Asha Shedge from Pimpri-Chinchwad Municipal Corporation criticizes local BJP leaders)

पिंपरी-चिंचवड भाजपची मला कीव येते. भाजप लाचखोर स्थायी समिती अध्यक्षांच्या पाठीशी उभा राहतो. मात्र, जनतेसाठी तुरुंगवास भोगताना केलेल्या आंदोलनाला निंदनीय म्हणतो, अशा शब्दात नगरसेविका आशा शेडगे यांनी स्थानिक भाजपवर टीका केलीय. 6 महिन्यांवर येऊन ठेपलेली महानगरपालिका निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्यावेळी पुढील वेळ आणि येणारा प्रसंगच ठरवेल, असं सूचक वक्तव्यही शेडगे यांनी केलंय.

राष्ट्रवादी अजित पवारांच्या नेतृत्वात निवडणूक लढणार

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वात लढली जाणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर पुण्यातील काही भाजप नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावाही अजित पवार यांनी केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या या वक्तव्यानं पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

पुण्यात भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात?

अजित पवार म्हणाले की, विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही अनेक वर्ष पिंपर-चिंचवडमध्ये कामं केली. मात्र 2013-14 मध्ये नरेंद्र मोदींची देशभरात हवा होती. त्यामुळे चांगलं काम करुनही आम्हाला विरोधात बसावं लागलं. परंतु आता भाजपमधील अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मी त्यांना सांगतो, की ज्यांना यायचं आहे त्यांनी डिस्क्वालिफाय (अपात्र) झालं नाही पाहिजे. ते निवडणुकीसाठी अपात्र ठरले तर पुढील 6 वर्ष ते निवडणूक लढू शकणार नाहीत. आत्ता जे आले आहेत ते अपक्ष आहेत, किंवा असे काही जण संपर्कात आहेत, ज्यांचे पती नगरसेवक आहेत, किंवा पत्नी नगरसेविका आहे तर तिचे पती पक्षाच्या संपर्कात आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा शिवसेनेला झटका

पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाने जोरदार ताकद लावायला सुरुवात केलीय. मंगळवारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप आणि इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केल्यानं राजकीय चर्चेला उधाण आले आहे. चिंचवडे हे खासदार श्रीरंग बाराने यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगरसेविकाआहेत. चिंचवडे हे शिक्षण मंडळाचे माजी सदस्य राहिलेले आहेत. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केल्याचं सांगितलं जातं.

इतर बातम्या :

Municipal Election 2022 : तीन सदस्यीय प्रभाग पद्धत; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर!

‘दिल्लीवरुन फोन आल्यानं राज्यपालांनी सही केली असेल’, नाना पटोलेंचा खोचक टोला

Asha Shedge from Pimpri-Chinchwad Municipal Corporation criticizes local BJP leaders