भाजपच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो, पंचायत समितीत भाजप-मनसेची युती

पालघरमधील वाडा तालुक्यात भाजपच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा एकत्र फोटो झळकत आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या (BJP and MNS banner Palghar) आहेत.

भाजपच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो, पंचायत समितीत भाजप-मनसेची युती

पालघर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे प्रखर आणि कडवट विरोधक अशी ओळख (BJP and MNS banner Palghar) आहे. मात्र नुकतंच पालघरमधील वाडा तालुक्यात भाजपच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो झळकत आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज ठाकरेंचा फोटो पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या (BJP and MNS banner Palghar) आहेत.

पालघर जिल्हा परिषद तसचं जिल्हा परिषद अतंर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 7 जानेवारीला यासाठी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यातील पंचायत समितीत भाजप आणि मनसेची युती आहे. त्यामुळे मोदी आणि राज ठाकरेंचे एकत्र एकाच बॅनरवर फोटो झळकल्याचे पाहायला मिळत आहेत.

विशेष म्हणजे यावर मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो पाहायला मिळत आहे. तसेच यावर विशेष म्हणजे या बॅनरवर भाजप नेते नारायण राणे यांचाही फोटोही पाहायला मिळत आहे. या बॅनरवर मत द्या विकासासाठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ! असेही लिहिले आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला (BJP and MNS banner Palghar) आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना काहीही करू शकते असा आरोप आता विरोधकांकडून केला जातो आहे. तर ही युती नसून गाव पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये समजुतीने झालेला तोडगा असून राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे बॅनर मनसेने लावले नसून भाजपने लावले असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *