AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE – वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो

वाराणसी : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर विविध लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. त्यातच येत्या 26 एप्रिलला म्हणजेच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवसाअगोदर म्हणजेच आज भाजपकडून वाराणसीत भव्य […]

LIVE - वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM
Share

वाराणसी : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर विविध लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. त्यातच येत्या 26 एप्रिलला म्हणजेच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवसाअगोदर म्हणजेच आज भाजपकडून वाराणसीत भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. या रोड शो दरम्यान 5 लाखांपेक्षा अधिक नागरिक जमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी विविध लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रचारदौरा, प्रचार सभांचे आयोजन करत आहेत. नरेंद्र मोदी हे देखील गेल्या काही दिवसांपासून देशभरात प्रचारदौरे करत आहेत. त्यांनी आतापर्यंत उत्तर प्रदेशातील मेरठ, सहारनपूर आणि अमरोह या ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. त्यानंतर 25 एप्रिलला भाजपतर्फे वाराणसीत भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. बनारस हिंदू विद्यापीठ ते दशाश्वमेह घाट असा हा रोड शो असणार आहे. हा रोड शो संपल्यानंतर संध्याकाळी नरेंद्र मोदी गंगा नदीची आरती करणार आहेत. हा रोड शो भव्य दिव्य असा करण्यात येणार आहे. या रोड शोच्या तयारीची संपूर्ण जबाबदारी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांकडे देण्यात आली आहे.

बनारस हिंदू विद्यापीठापासून रोड शो ची सुरुवात

नरेंद्र मोदी यांच्या रोड शो ला बनारस हिंदू विद्यापीठापासून सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या विद्यापीठाजवळील पंडीत मोहन मालवीय यांच्या पुतळ्याची साफसफाई आणि सजावट करण्यात येत आहे. या रोड शो दरम्यान वाराणसीमध्ये राहणारे वेगवेगळ्या समाजातील लोक मोदींचे ठिकठिकाणी स्वागत करणार आहेत. त्यानंतर हा रोड शो वाराणसीतील प्रसिद्ध पैलवान लस्सीच्या दुकानाजवळ पोहोचेल. पैलवान लस्सीचे दुकान संपूर्ण वाराणसीत प्रसिद्ध आहे.

माझ्या दुकानाचे नाव जरी पैलवान लस्सी असले, तरी खरे पैलवान मोदीच आहेत. असे असतानाही काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी आल्या, तर त्यांचं काय होईल याचा विचार आपण करु शकतो, असं पैलवान लस्सीवाला दुकानाचे मालक ब्रजेश यादव यांनी सांगितलं. तसेच, यावेळी नरेंद्र मोदींना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, असेही ब्रजेश यादव म्हणाले.

असा असेल रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो अस्सी मोड, मुमुक्षु भवन, आनंदमयी रुग्णालय, शिवाला तिराहा, सोनारपुरा, जगमबाडी, येथून पुढे गोदौलियाजवळ पोहोचेल. यावेळी रस्त्याच्या दुर्तफा बॅरिगेट्स लावण्यात येणार आहेत. यामुळे नरेंद्र मोदींच्या रोड शो दरम्यान कोणत्याही नागरिकाला पुढे येता येणार नाही. तसेच संपूर्ण वाराणसीत मोदींच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहेत.

मोदींवर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव

या रोड शोदरम्यान मोंदीवर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात येणार आहे. हा रोड शो सात किलोमीटरचा असणार आहे. हा रोड शो काशी विश्वनाथ मंदीर येथे संपेल. सध्या या ठिकाणच्या दशाश्वमेह घाटावर रंगरंगोटीची कामे सुरु आहे. तसेच या रोड शो दरम्यान झाडाच्या फांद्यां अडसर नको म्हणून त्या कापण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मोदींच्या रोड शो दरम्यान दुकानंही बंद ठेवण्यात येणार आहेत.

त्याशिवाय, वाराणसीच्या अस्सी घाटाला नववधूप्रमाणे सजवण्यात आलं आहे. या रोड शो दरम्यान भाजप अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह उपस्थित असणार आहेत. रोड शो नंतर नरेंद्र मोदी हे गंगा नदीत आरती करण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींसोबत जेवण करतील. यासाठी 300 लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

रोड शो नंतर 26 एप्रिलला नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी ते वाराणसीतील कालभैरव आणि काशी विश्वनाथ मंदीरात जाऊन पुजा करणार आहेत. त्यानंतर ते बाबा विश्वनाथांचे दर्शन करणार आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी विधानसभेच्या निवडणुकीतही मोदींनी अशाचप्रकारे रोड शो करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

वाराणसी येथे शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या मतदारसंघासाठी भाजपकडून नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यादेखील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाराणसी लोकसभा मतदारसंघात यंदाची लढत चुरशीची ठरणार आहे.

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.