Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी देहू दौऱ्यावर, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी देहू दौऱ्यावर, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार
नरेंद्र मोदी (फाईल फोटो)
Image Credit source: Twitter

काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांना घेऊन आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना देहूत येण्याचं आमंत्रण दिलं होतं. हे आमंत्रण पंतप्रधानांनी स्विकारलं असून 14 जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत, अशी माहिती भोसले यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

May 22, 2022 | 8:13 PM

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी देहूत येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांना घेऊन आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना देहूत येण्याचं आमंत्रण दिलं होतं. हे आमंत्रण पंतप्रधानांनी स्विकारलं असून 14 जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत, अशी माहिती आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

आचार्य तुषार भोसले यांचे ट्वीट

महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी हा ऐतिहासिक क्षण असेल असे आचार्य तुषार भोसले यांनी टि्वटमध्ये लिहिले आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्री क्षेत्र देहूत येणार आहेत. असेही त्यांनी लिहिले आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी 14 जून रोजी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर दौरा

ऐन वारीच्या तोंडावर पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा असेल. राज्यात आगामी काळात होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या दौऱ्याला महत्त्व असणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी थेट पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचतील.

वारीचा सोहळा 20 जूनपासून

पंतप्रधान मोदी 14 जूनला देहूत येणार आहेत, आणि यंदाचा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 20 जूनपासून सुरु होईल. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे होऊ न शकलेला वारीचा सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात होणार आहे. त्याआधीच पंतप्रधान देहूत येत असल्याने या दौऱ्याचे विशेष महत्त्व असेल.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें