PMO कार्यालयात हिंदुत्वविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात, सुब्रह्यण्यम स्वामींचा दावा

सुब्रह्यण्यम स्वामी यांच्या ट्विटमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता (Subramanian Swamy on Sharad Pawar)  आहे.

PMO कार्यालयात हिंदुत्वविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात, सुब्रह्यण्यम स्वामींचा दावा

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयात हिंदुत्वविरोधी मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांचे वर्चस्व निर्माण झाले (Subramanian Swamy on Sharad Pawar)  आहे. यातील काही अधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात आहेत. असे गंभीर आरोप भाजप खासदार सुब्रह्यण्यम स्वामी यांनी केला (Subramanian Swamy on Sharad Pawar)  आहे.

“सध्या पंतप्रधान कार्यालयात हिंदुत्व विरोधी मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. यातील काही अधिकारी हे शरद पवार आणि त्यांची मुलगी म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात आहेत. हिंदुत्व विरोधी मानसिकता असलेले हे अधिकारी देशभक्त अधिकाऱ्यांच्या कामात अडथळे आणत आहेत. हे देशभक्त अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करु इच्छितात. मात्र त्यांना ही कारवाई करु दिली जात नाही.”

“देशभरात सुरु असलेल्या सीएएविरोधी आंदोलनासह तसेच दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या गोष्टींची दखल घेणं गरजेचं आहे,” असे ट्विट सुब्रह्यण्यम स्वामी यांनी केलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नवी दिल्ली राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु आहे. गेल्या आठवड्यात ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनांमुळे 40 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. या हिंसाचाराबद्दल देशभर चर्चा होत आहेत. तर यावरुन नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र सुब्रह्यण्यम स्वामी यांच्या ट्विटमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता (Subramanian Swamy on Sharad Pawar)  आहे.

Published On - 8:56 pm, Mon, 2 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI