शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन संशयास्पद; पोलिसांनी चौकशी करावी, नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे

पवार साहेब नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजुने उभे राहिले. कुठलंही आंदोलन आतापर्यंत नेत्याच्या घरापर्यंत नेत्यापर्यंत गेलेलं नाही. या सरकारनं जे निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतले ते कुणीच घेतलेले नाहीत. असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन संशयास्पद; पोलिसांनी चौकशी करावी, नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे
धनंजय मुंडेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 5:45 PM

एसटी कर्मचारी प्रचंड आक्रमक झाले आहेत. एसटीच्या विलिनिकरणात शरद पवार (Sharad Pawar) यांनीच अडथळला आणल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन (ST workers’ agitation) करण्यात आले. मात्र या आंदोलनाला (agitation) हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले. आंदोलकांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच चप्पल आणि दगडफेक देखील करण्यात आली. दरम्यान आता या आंदोलनावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेब नेहमीच कर्मचाऱ्यांच्या  बाजुने उभे राहिले. कुठलंही आंदोलन आतापर्यंत नेत्याच्या घरापर्यंत नेत्यापर्यंत गेलेलं नाही. या सरकारनं जे निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतले ते कुणीच घेतलेले नाहीत. घरावर दगड फेकून, चप्पल फेकून प्रश्न सुटणार नसल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले मुंडे?

‘पवार साहेब नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजुने राहिले. कुठलंही आंदोलन आतापर्यंत नेत्याच्या घरापर्यंत नेत्यापर्यंत गेलेलं नाही. या सरकारनं जे निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतले ते कुणीच घेतलेले नाहीत. घरावर दगड फेकून, चप्पल फेकून प्रश्न सुटणार नाहीत. आजचे आंदोलन अतिशय दुर्दैवी आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांना कदाचीत इतिहास माहित नसावा. शरद पवार यांनी कामगाराच्या कल्याणासाठी आपली हयात घालवली. आज त्यांच्या घरावर जे आंदोलन झाले ते संशयास्पद आहे. एकीकडे आझाज मैदानात जल्लोष करण्यात आला, मग दुसरीकडे शरद पवार यांच्या घरासमोर आचानक आंदोलन कसे करण्यात आले? हा तर लोकशाहीचा गळा चिरडून मारण्याचा प्रकार झाल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी तपास करावा

पुढे बोलताना धनंजय मु़ंडे यांनी म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांना जे काही मिळालं ते पवार साहेबांच्या मध्यस्थीमुळे मिळालं. हे षडयंत्र आहे. याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. पवार साहेब आमचं दैवत आहेत. देशाच्या राज्याच्या माणसासाठी त्यांनी आयुष्य वाहिलंय. संपूर्ण राज्याची शांतता बिघडवण्याचा हा प्रयत्न कुणाकडून सुरु आहे, याचा तपास झाला पाहिजे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Petrol Diesel Price Today : सलग दुस-या दिवशी किरकोळ भाव वाढीचे सत्र थांबले

ST Andolan Mumbai : कुठली तरी अज्ञात शक्ती, राऊतांची पहिली प्रतिक्रिया, पवारांच्या मुंबईतल्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन

ST Andolan Mumbai: हा तर माझ्या घरावर हल्ला, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सुप्रिया सुळेंनी हात जोडले

Non Stop LIVE Update
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.