AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंसाठी रात्र वैऱ्याची, उद्या शिंदे डाव टाकणार, थेट…; पुन्हा एकदा उबाठामध्ये सर्वात मोठा भूकंप

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत दाखल झाले आहेत. आजची रात्र ठाकरेंसाठी निर्णायक ठरणार असून, उद्या शिंदे गट मोठा राजकीय 'डाव' टाकणार आहे. यामुळे ठाकरे गटात अधिकृतपणे मोठी फूट पडणार असून महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका भूकंपाची शक्यता आहे.

ठाकरेंसाठी रात्र वैऱ्याची, उद्या शिंदे डाव टाकणार, थेट...; पुन्हा एकदा उबाठामध्ये सर्वात मोठा भूकंप
uddhav thackerayImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 16, 2026 | 11:27 PM
Share

अखेर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही चार्टड विमानाने दिल्लीत दाखल होत आहेत. त्यामुळे आजची रात्र ठाकरेंसाठी वैऱ्याची आहे. तर एकनाथ शिंदे हे उद्या मोठा डाव टाकणार आहे. हा डाव टाकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अधिकृतपणे मोठी फूट पडणार आहे. ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. त्यामुळे उद्याच्या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब बाकचौरे आणि खासदार राजाभाऊ वाजे आदी सहा खासदार दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांच्या सोबत आज रात्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे आणि हे सहाही खासदार एकत्र येऊन लोकसभा अध्यक्षांना भेटणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उद्याच डाव

दरम्यान, उद्या सहाही खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकसभा अध्यक्षांना भेटणार आहे. यावेळी फुटीर खासदार वेगळा गट स्थापन करत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्षांना देणार आहेत. यावेळी त्यांच्या संसदीय नेत्याचं नावही लोकसभा अध्यक्षांना देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, हे सहाही खासदार वेगळा गट करणार की शिंदे गटात सामिल होणार हे आज रात्रीच ठरणार आहे. त्यामुळे या घडामोडींकडे देशाचं लक्षल लागलं आहे.

उद्या पत्रकार परिषद

अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंत उद्या दिल्लीत एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी राऊत काय भूमिका मांडतात? काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे किती खासदार उपस्थित राहतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी आज एक ट्विट करून दिल्लीत रात्रीच घोडेबाजार होणार असल्याचा दावा केला आहे. या खासदारांना फुटण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी रुपये अगाऊ रक्कम देण्यात येणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू