Aurangabad Train Mishap | राजकारणातील दिग्गज नेत्यांकडून श्रद्धांजली

मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली (Political Leaders tweet on Aurangabad Train Mishap) आहे.

Aurangabad Train Mishap | राजकारणातील दिग्गज नेत्यांकडून श्रद्धांजली
Follow us
| Updated on: May 08, 2020 | 12:23 PM

औरंगाबाद : मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली (Political Leaders tweet on Aurangabad Train Mishap) आहे. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला. औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर करमाड शिवारात एमआयडीसीच्या निर्माणाधीन पुलाजवळ ही दुर्घटना घडली. या घटनेवर राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त (Political Leaders tweet on Aurangabad Train Mishap) करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत मृत मजुरांना श्रद्धांजली वाहिली आहे.

“औरंगाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातातील जीवितहानीमुळे अत्यंत दुख: होत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी या अपघाता संबंधित बोललो असून ते परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आवश्यक सर्व सहकार्य दिले जात आहे”, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

“औरंगाबाद येथील रेल्वे अपघातामुळे झालेल्या जीवितहानीने खूप दु: ख झाले. माझी प्रार्थना मजुरांच्या कुटुंबियांसोबत आहेत”, असं ट्वीट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

“मालवाहू रेल्वेखाली मजुरांचा चिरडून मृत्यू झाल्याच्या बातमीने धक्का बसला आहे. आपण आपल्या राष्ट्र निर्माण करणाऱ्या मजुरांसोबत चुकीचा व्यवहार केल्याची लाज वाटली पाहिजे. मृत मजुरांच्या कुटुंबासाठी मी दुख: व्यक्त करतो आणि सर्व जखमी झालेल्या मजुरांसाठी प्रार्थना करतो,” असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.

“औरंगाबाद रेल्वे अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला. या अपघाताबद्दल मी दुख: व्यक्त करतो. मृत मजुरांच्या कुटुंबासोबत आहे”, असं ट्वीट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झालेल्या रेल्व अपघाताबद्दल ऐकून मी दु:खी आहे. हा एक धक्कादायक अपघात आहे. मी मृत मजुरांच्या कुटुंबासोबत आहे. जखमी मजूर लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रभू श्री राम यांच्याकडे प्रार्थना करतो, असं ट्वीट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

सर्व राजकीय वर्तुळातून या घटनेवर शोक व्यक्त केला जात आहे. तर काहींनी मजुरांना  आवाहन केलं की, गावाकडे जाण्याची सोय केली जात आहे. कुणीही जीव धोक्यात धालून प्रवास करु नये.

नेमकं काय झालं?

औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर करमाड शिवारात ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकलेले मजूर रेल्वे रुळावरुन औरंगाबादच्या दिशेने पायी येत होते. रात्री थकल्यावर रेल्वे बंद असल्याचा विचार करुन मजुरांनी रुळावरच झोप घेतली असावी, असा अंदाज आहे.

पहाटे 6.30 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या मालवाहू रेल्वेखाली हे मजूर चिरडले गेले. मालगाडीने 19 मजुरांना धडक दिली. यामध्ये 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच जण जखमी आहेत. यामध्ये लहान मुलांचा समावेश असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. एमआयडीसीच्या निर्माणाधीन पुलाजवळ ही दुर्घटना घडली.

मजुरांची घरची वाट

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेक स्थलांतरित मजूर परराज्यात अडकले आहेत. विशेष ट्रेन किंवा बसच्या माध्यमातून या मजुरांना आपापल्या राज्यात नेण्याची व्यवस्था हळूहळू केली जात आहे. देशाच्या विविध भागातून श्रमिक एक्सप्रेस निघाल्या आहेत.

भूक, पैशांची कमतरता, कोरोनाची भीती आणि कुटुंबाची ओढ अशा विविध कारणांमुळे धीर सुटलेल्या मजुरांनी आधीच आपल्या घरची वाट धरली होती. काही जण हजारो किलोमीटर आणि कित्येक दिवसांच्या प्रवासानंतर घरी पोहोचले, तर कोणाला वाटेतच प्राण सोडावे लागल्याच्या करुण कहाण्या समोर आल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Aurangabad Train Mishap | मजुरांनो, धीर सोडू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, औरंगाबादेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख

औरंगाबादमध्ये रुळावर झोपलेल्या 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून करुण अंत

Aurangabad Train Mishap | औरंगाबादच्या जीवघेण्या रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.