पंढरपूरची मंदिर समिती शिवसेनेकडे, नवीन मंदिर समित्यांसाठी जोरदार राजकीय लॉबिंग

यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार आहे. (Political lobbying  for New Temple Committee Form)

पंढरपूरची मंदिर समिती शिवसेनेकडे, नवीन मंदिर समित्यांसाठी जोरदार राजकीय लॉबिंग
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 9:55 AM

सोलापूर : राज्यातील मंदिर समिती बरखास्त करुन नवीन समिती गठित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्यातील महत्त्वाच्या मंदिर समितीवर नेमणुकीसाठी महाविकासाआघाडीत जोरदार फिल्डींग पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांचे यासाठी जोरदार लॉबिंगही होत आहे. (Political lobbying  for New Temple Committee Form)

महाविकासआघाडीतील मित्रपक्षांनी वाटून घेतलेल्या समित्यांमध्ये पंढरपूरची मंदिर समिती शिवसेनेकडे गेली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार आहे.

राज्यातील महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर सरकारने अनेक महामंडळे बरखास्त केली होती. पण देवस्थान समित्यांमध्ये कोणतेही बदल केले नव्हते. मात्र आता भाजपच्या ताब्यातील देवस्थान समित्या काढून घेण्यासाठी राज्य पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर समिती बरखास्त करून नवीन समिती गठीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान या मंदिर समितीवर वर्णी लावण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लॉबिंग सुरु केले आहे. यामुळे अनेक नेत्यांनी पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.

तर दुसरीकडे शिर्डीत सध्या तदर्थ समिती काम पाहत आहे. जुन्या विश्वस्तांचा कार्यकाळ ‌संपल्यानंतर नवीन विश्वस्त किंवा अध्यक्ष नेमण्यात आले नाहीत. सध्या जिल्हा न्यायाधीश प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. राज्य सरकारच्या विधी न्याय खात्याकडून शिर्डी संस्थान विश्वस्तांची‌ नेमणूक होते.

मात्र महाविकासआघाडी सरकारमधील कोणत्या पक्षाला शिर्डी सं‌स्थानचे अध्यक्षपद मिळणार आणि कोणत्या पक्षाचे किती विश्वस्त असणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागलं आहे.  (Political lobbying  for New Temple Committee Form)

संबंधित बातम्या : 

पुण्यात कोरोना लसीच्या कोल्ड स्टोरेजसाठी चाचपणी, चार कंपन्यांचा प्रतिसाद

महाराष्ट्रातल्या आणखी एका बँकेचा परवाना रद्द, ग्राहकांना कसे मिळणार पैसे परत?

मोठी बातमी: दिवाळीत मुंबईतील दोन जैन मंदिरे उघडण्यास न्यायालयाची परवानगी

दिवाळीआधी राज्यातील मंदिरे उघडा, अन्यथा दिवाळीनंतर कोर्टात याचिका दाखल करणार : सुजय विखे

Non Stop LIVE Update
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.