'तू राजकारणात आलीस तुझा भाऊ का नाही?' पूनम महाजन म्हणतात...

भाजप खासदार पूनम महाजन यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना दिलखुलास माहिती दिली.

Punam Mahajan on why her brother out of politics, ‘तू राजकारणात आलीस तुझा भाऊ का नाही?’ पूनम महाजन म्हणतात…

औरंगाबाद : भाजप खासदार पूनम महाजन यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना दिलखुलास माहिती दिली (Poonam Mahajan on why her brother out of politics). यावेळी त्यांनी त्यांचा भाऊ राहुल महाजन राजकारणात का आला नाही या सातत्याने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. यावेळी त्यांनी आमच्या घरात मुलगा-मुलगी असा फरक नव्हता असं स्पष्ट केलं. त्या इंदिराबाई पाठक महिला कला महाविद्यालयाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात बोलत होत्या.

पूनम महाजन म्हणाल्या, “मला बऱ्याचदा विचारतात तू राजकारणात आलीस. तुझा भाऊ का नाही? तेव्हा मी म्हणते माझा भाऊ माझ्यापेक्षा चांगला चहा बनवू शकतो. का तर आमच्या घरात मुलगा मुलगी असा फरक नव्हता. त्यामुळेच मी राजकारणात आले, मात्र, माझा भाऊ राजकारणात आला नाही. माझा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता मला राजकारणात यायचं नव्हतं पण मी अपघाताने आले. वडील गेले कुणीतरी असावं म्हणून मी राजकारणात आले.”

राजकारणात आल्यावर मी पहिली निवडणूक जोरदार हरले. त्या निवडणुकीनं मला खूप काही शिकवलं. मी पुन्हा कामाला लागले आणि देशातील सर्वात अवघड मतदारसंघात काँग्रेसला तोडून फोडून विजय मिळवला. मी संसदेमध्ये बसल्यावर सुद्धा घरची सगळी कामं करू शकते. महिला मल्टिटास्किंग असतात. स्त्रीने जर ठरवलं तर ती सर्व काही करून दाखवते. मला घरातून पाठिंबा मिळाला आणि मी पायलट झाले, असंही पूनम महाजन यांनी यावेळी नमूद केलं.

“महाराष्ट्रात पुरुषांनी महिलेला आपलं खेळणं ठरवलं”

पूनम महाजन यांनी यावेळी महाराष्ट्रात महिलांबाबत असलेल्या पुरुषी दृष्टीकोनावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “मुलीचा सन्मान मुलगीच करू शकते. महिलेचा सन्मान महिलाच करू शकते. मी जे सांगते ते माझी मुलगी सगळं करते, पण मुलगा काहीच करत नाही. महाराष्ट्रात पुरुषांनी महिलेला आपलं खेळणं ठरवलं आहे. यासाठी महिलांना लढायला संस्थांनीच शिकवलं पाहिजे.”

संबंधित व्हिडीओ :


Poonam Mahajan on why her brother out of politics

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *