शिवसेनेचं संभाव्य खातेवाटप : एकनाथ शिंदेंना सार्वजनिक बांधकाम, तर आदित्य ठाकरेंना काय?

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा येत्या 2-3 दिवसात मिटण्याची चिन्ह दिसू लागली (Possible Ministry List of Shivsena) आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संभाव्य खातेवाटप समोर येत आहे.

शिवसेनेचं संभाव्य खातेवाटप : एकनाथ शिंदेंना सार्वजनिक बांधकाम, तर आदित्य ठाकरेंना काय?

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा येत्या 2-3 दिवसात मिटण्याची चिन्ह दिसू लागली (Possible Ministry List of Shivsena) आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संभाव्य खातेवाटप समोर येत आहे. यानुसार शिवसेनेला अपेक्षित असलेले मुख्यमंत्रिपद त्यांच्या वाटेला आल्याचे पाहायला मिळत (Possible Ministry List of Shivsena) आहे. यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांचे संभाव्य खातेवाटप समोर आलं होतं. यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या गळ्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची चिन्हं (Possible Ministry List of Shivsena) आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये 16-14-12 चा फॉर्म्युला ठरल्याचे बोललं जात आहे. संभाव्य मंत्रिमंडळानुसार शिवसेनेला जवळपास 16 मंत्रिपद मिळणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार असल्याचे यात पाहायला मिळत आहे. तर युवासेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची शालेय शिक्षणमंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर शिवसेना नेते आणि आमदार एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे.

त्याशिवाय रवींद्र वायकर यांची नगरविकास मंत्रीपदी वर्णी लागू शकते. तर सुभाष देसाई यांना उद्योग, अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय उदय सामंत यांना गृहनिर्माण मंत्रिमंडळाचा कारभार कारभार दिला जाण्याची माहिती मिळत (Possible Ministry List of Shivsena) आहे.

याव्यतिरिक्त दादा भुसे, अनिल परब, गुलाबराव पाटील, प्रकाश आबिटकर, दिवाकर रावते, दीपक केसरकर, रामदास कदम, बच्चू कडू, अंबादास दानवे या आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

आघाडीचं संभाव्य खातेवाटप 

तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांचं संभाव्य खातेवाटप समोर आलं आहे. यात अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद किंवा गृहमंत्रिपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची चिन्हं आहेत. तर कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रालय सुपूर्द केलं जाण्याची शक्यता (Possible Ministry List of Shivsena) आहे.

नवाब मलिक यांना कामगार मंत्रालय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना महसूल खात्याचा कारभार दिला जाण्याचे संकेत आहेत. याशिवाय विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी या काँग्रेस आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

चर्चा आणि आराखडे

मुख्यमंत्रिपद जर शिवसेनेला पाच वर्षांसाठी दिलं, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद पाच वर्ष पूर्णवेळ मिळेल. उपमुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची नावं चर्चेत आहेत.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे

अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद जर राष्ट्रवादी-शिवसेनेत विभागलं गेलं, तर काँग्रेसचा उपमुख्यमंत्री पाच वर्ष पूर्णवेळ राहील, अशी चर्चा आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI