प्रज्ञा ठाकूर  दहशतवादी नाही, राष्ट्रवादी महिला आहे : बाबा रामदेव

पाटणा : दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या लोकसभा उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांना योग गुरु बाबा रामदेव यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच प्रज्ञा ठाकूर दहशतवादी नसून राष्ट्रवादी महिला असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते पाटणा साहिब येथून लोकसभा निवडणूक मैदानात असणाऱ्या भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उमेदवारी अर्जाच्या …

प्रज्ञा ठाकूर  दहशतवादी नाही, राष्ट्रवादी महिला आहे : बाबा रामदेव

पाटणा : दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या लोकसभा उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांना योग गुरु बाबा रामदेव यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच प्रज्ञा ठाकूर दहशतवादी नसून राष्ट्रवादी महिला असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते पाटणा साहिब येथून लोकसभा निवडणूक मैदानात असणाऱ्या भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उमेदवारी अर्जाच्या वेळी उपस्थित होते.

ठाकूर यांना फक्त संशयावरून 9 वर्षांपर्यंत तुरुंगात छळले गेले, असाही दावा रामदेव यांनी केला. ते म्हणाले, “फक्त संशयावरुन एका व्यक्तीला अटक करण्यात आली आणि 9 वर्षांपर्यंत तिला शारिरीक आणि मानसिक त्रास देण्यात आला. त्यांना ज्या तणावातून जावे लागले त्यामुळे त्यांना कँसरला सामोरे जावे लागले.” तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना प्रज्ञा ठाकूरचा दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय होता. यावर विचारणा केली असता रामदेव यांनी उत्तर देणे टाळले.

दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी आरोपी प्रज्ञा ठाकूर यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या मुंबई एटीएस प्रमुख हेमंत करकरेंचा मृत्यू माझ्या शापामुळे झाल्याचे वक्तव्य केले होते. तसेच करकरे धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या आणि त्यांचा निषेध झाला.

शहीद करकरेंचा महाराष्ट्रातील सहकारी साध्वी प्रज्ञाविरोधात निवडणूक लढवणार

दरम्यान, शहीद हेमंत करकरे यांचे सहकारी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) रियाज देशमुख यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

“भोपाळमध्ये 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करत आहे. कोणीही शहीद हेमंत करकरेंची बदनामी करु नये, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळेच मी प्रज्ञा ठाकूरविरोधात निवडणूक लढवण्याचे ठरवले.”

– माजी ACP रियाज देशमुख

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *