Bhagat Singh Koshyari Statment : राज्यपालांचं विधान चुकीचं नाही, त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या राजकारणाला उघडं पाडलं- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedka : प्रकाश आंबेडकर यांच्याकडून राज्यपालांच्या विधानाचं समर्थन

Bhagat Singh Koshyari Statment : राज्यपालांचं विधान चुकीचं नाही, त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या राजकारणाला उघडं पाडलं- प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 12:51 PM

पुणे : राज्यपालांनी मुंबईबाबत केलेल्या विधानावर (Bhagat Singh Koshyari Statment) सडकून टीका होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मात्र या विधानाचं समर्थन केलं आहे. राज्यपालांचं विधान चुकीचं नाही, त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या राजकारणाला उघडं पाडलं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राज्यपालांच्या विधानाबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यांनी टीव्ही 9 मराठीसोबत खास बातचित केली. तेव्हा त्यांनी कोश्यारी यांच्या विधानाचं समर्थन केलं. “राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नाही. मी त्याच्या विधानाचं समर्थन करतो. राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झाला नाही. उलट राज्यातील नेत्यांचं राजकारण उघडं पाडलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यावरची झापडं उघडली”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलंय. राज्यपालांची उचलबांगडी करण्याची गरज नाही. राज्यपाल जे बोललेत ती सत्य परिस्थिती आहे, असं आंबेडकर म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

नितेश राणेंकडूनही समर्थन

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांचं समर्थन केलं आहे. मी त्या कार्यक्रमात होतो. राज्यपाल काहीच वावगं बोलले नाही. त्यांनी मुंबईच्या उत्कर्षात योगदान देणाऱ्या त्या त्या समाजाची आठवण करून दिली. राज्यपालांनी कुणाचा अपमान केला असता तर आम्ही बोललो असतो. त्यांनी त्या त्या समाजाच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला असं मला बिलकूल वाटत नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. आज एक वाजता ही पत्रकार परिषद होणर आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “राज्यपाल महोदयांच्या बेताल विधानाचा समाचार घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद-आज दुपारी मातोश्री येथे1 वाजता”, असं ट्वि़ट राऊतांनी केलं आहे.

राऊत आक्रमक

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका करतानाच शिंदेगट आणि भाजपची कान उघाडणी केली आहे. राऊतांनी एकापाठोपाठ चार ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. राज्यात भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला आहे. थोडा जरी स्वाभिमान आणि अभिमान असेल तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्या. अथवा शिवसेनेचं नाव घेऊ नका, अशा शब्दात राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.