AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारावं की कटाचा मास्टरमाईंड आणि वाझेंचा बाप कोण? : प्रसाद लाड

भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांवरुन महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारावं की कटाचा मास्टरमाईंड आणि वाझेंचा बाप कोण? : प्रसाद लाड
प्रसाद लाड, भाजप आमदार
| Updated on: Mar 21, 2021 | 10:18 PM
Share

मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांवरुन महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कटाचा मास्टरमाईंड आणि वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा बाप कोण? असा प्रश्न विचारावा, अशी मागणी केलीय. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या कामात अडथळा आणत असल्याचाही आरोप केला (Prasad Lad criticize Sharad Pawar Anil Deshmukh and Uddhav Thackeray over corruption charges).

प्रसाद लाड म्हणाले, “एटीएसचे तपास अधिकारी शिवदीप लांडे यांना महाविकास आघाडी सरकार काम करू देत नाहीये. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकार खंडणीबाज की खंडणीबाद हा प्रश्न पडलाय. गृहखात्यात बदली करणं, पैसे घेणं ही राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा आहे. माजी आयुक्तांनी महिन्याला 100 कोटी म्हटलंय. यांनी इतर राज्यांमध्ये काही घोळ केलाय का याचा तपास व्हायला हवा. या प्रकरणाची इडीकरून चौकशी व्हायला हवी.”

‘अनिल देशमुख आणि इतरांचा बाप कोण याची चौकशी व्हावी’

“100 कोटींची ऊलाढाल आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि इतरांचा बाप कोण याची चौकशी व्हायला हवी. एनआयएने मनसुख हिरेनचा तपास हाती घेतला त्यावेळी एटीएसने तपासाची सूत्रं हाती घेतली. शिवदिप लांडे सारख्या अधिकाऱ्याला सरकार काम करू देत नाहीये. त्यांना गृह खातं काम करू देत नाहीये. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे द्यायला हवं. मनसुखची हत्या झाली हे आमचे नेते वारंवार सांगत होते, पण मुख्यमंत्री तो लादेन आहे का असं म्हणत होते,” असंही त्यांनी नमूद केलं.

‘संजय राऊतांची पोपटपंची बंद’

प्रसाद लाड यांनी यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला. संजय राऊतांची पोपटपंची बंद झाल्याचं खोचक विधान त्यांनी केलं. ते पुढे म्हणाले, “या प्रकरणी गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल व्हायला हवं आणि त्यांची चौकशी व्हायला हवी. शरद पवारांचं उत्तर म्हणजे अर्धसत्य आहे. या चित्रपटाप्रमाणेच त्यांची उत्तरं होती. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारायला हवं की याचा मास्टरमाईंड कोण आणि वाझेंचा बाप कोण?”

हेही वाचा :

वाझेप्रकरणी देशमुखांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा; प्रसाद लाड यांची जोरदार मागणी

पवारसाहेब जाणते राजे, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवा, भाजपकडून जोर

अनिल देशमुख यांच्याविरोधात पहिली तक्रार दाखल, तक्रारीत शरद पवार यांचंही नाव

व्हिडीओ पाहा :

Prasad Lad criticize Sharad Pawar Anil Deshmukh and Uddhav Thackeray over corruption charges

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.