घरी नसताना एका महिलेचं ऑफिस फौजफाटा नेऊन तोडलं, यात कोणती मर्दानगी?; दरेकरांचा राऊतांना सवाल

“घरी नसताना एका महिलेचं ऑफिस फौजफाटा नेऊन तोडलं, यात कोणती मर्दानगी?”

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:11 PM, 24 Nov 2020

मुंबई : “घरी नसताना एका महिलेचं ऑफिस फौजफाटा नेऊन तोडलं, यात कोणती मर्दानगी?” (Pravin Darekar Answer To Sanjay Raut), असा सवाल उपस्थित करत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. “प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली, ही नामर्दांगी आहे”, अशी टीका संजय राऊतांनी भाजप आणि ईडीवर केली होती. त्यावरुन आता दरेकरांनी त्यांना कंगनाच्या कार्यलयावर केलेल्या कारवाईची आठवण करुन देत सवाल केला आहे (Pravin Darekar Answer To Sanjay Raut).

संजय राऊत काय म्हणाले?

“गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआय या यंत्रणा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखे वागत असतील तरी आम्ही पर्वा करत नाही. आज प्रताप सरनाईक त्यांच्या घरी नाही आहेत. त्यांची मुले घरी आहेत. हे पाहून त्यांनी जी धाड टाकली ही नामर्दांगी आहे. भाजपने सरळ लढाई करावी. हे शिखंडीसारखे यंत्रणांच्या आडून कारवाई करु नका”, असा घणाघात संजय राऊतांनी ईडी आणि भाजपवर केला.

दरेकरांचा पलटवार

“प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली,यात कसली मर्दानगी”,असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना विचारलं पाहिजे, एक महिला घरी नसताना… सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती?”, असा उद्विग्न सवाल दरेकरांनी केला आहे (Pravin Darekar Answer To Sanjay Raut).

प्रताप सरनाईकांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीचे छापे

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली. यावेळी प्रताप सरनाईक हे घरी नव्हते. ते सध्या भारताच्या बाहेर आहे. मात्र, त्यांचा मुलगा विहंग हा घरी होता. ईडीने विहंगची चार तास चौकशी करुन त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर ईडी प्रताप सरनाईकांचा दुसरा मुलगा पूर्वेश सरनाईक यांच्या घरी गेली आहे. त्यानंतर ईडी विहंग आणि पूर्वेश या दोघांचीही एकत्र चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

Pravin Darekar Answer To Sanjay Raut

संबंधित बातम्या :

टॉवर, पार्क, कॉम्प्लेक्स ते संस्कृती दहीहंडी, प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपचा पसारा नेमका किती?

प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत, सरनाईकांच्या घरावर ईडीच्या छापेमारीनंतर राणेंचा टोला

‘ईडी’ने आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडली!, सरनाईकांच्या घरावरील छापेमारीवर संजय राऊतांचा टोला

सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, मनसेसोबत जाणार नाही : देवेंद्र फडणवीस

ED raids on Pratap Sarnaik | आमदार प्रताप सरनाईकांचे सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात, ईडी कार्यालयात नेण्याची शक्यता