कंगनाच्या जीवावर राज्य चालवता का? प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला सवाल

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेकडून अभिनेत्री कंगना रनौतवर होणाऱ्या टीकेवर हल्ला चढवला आहे (Pravin Darekar criticize Thackeray Government over Kangana Ranaut).

कंगनाच्या जीवावर राज्य चालवता का? प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेकडून अभिनेत्री कंगना रनौतवर होणाऱ्या टीकेवर हल्ला चढवला आहे (Pravin Darekar criticize Thackeray Government over Kangana Ranaut). ‘कंगना रनौत पळून गेली असं बोलणं अत्यंत चुकीचं आहे. पोलीस खातं तुमचं आहे. गृहमंत्री तुमचे आहेत. तुम्ही कंगनाच्या जीवावर राज्य चालवता का?” असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला. यावेळी त्यांनी शिवसेनेला कंगना सोडून इतर विषय सुचत नसल्याचाही आरोप केला.

प्रवीण दरेकर म्हणाले, “मला वाटतं शिवसेनेला आणि शिवसेना नेत्यांना कंगनाशिवाय दुसरा विषय सापडत नाही. एका बाजूला शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता असलेले संजय राऊत कंगना विषय आमच्यासाठी संपला असे म्हणतात. दुसरीकडे प्रताप सरनाईक यांच्यासारखे शिवसेनेचे इतर नेते कंगना पळून गेली म्हणतात. एखाद्या महिलेबाबत कितीवेळा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलावं? कंगनाच्या कोणत्याही विषयाचं आम्ही समर्थन करत नाही. परंतू कोरोनाचं अपयश, राज्याची इतर गोष्टींमध्ये झालेली दुरावस्था याच्यावरुन लक्ष हटवण्यासाठी हेच कंगनाच्या नावाने ओरडत आहेत. पुन्हा भाजपला कंगनाविषयावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.”

“एका महिलेबाबत ती पळून गेली असं बोलणं अत्यंत चुकीचं आहे. पोलीस खातं तुमचं आहे, गृहमंत्री तुमचे आहेत. तुम्ही कंगनाच्या जीवावर राज्य चालवता का? ती ड्रग्जची माहिती देणार होती, मग तुम्ही काय करता? पोलिसांचं, तुमच्या सरकारचं काम आहे, शोधून काढा. आवश्यकता लागली तर कंगनाला पुन्हा बोलवा. ती येथे यायला तयार आहे,” असंही प्रवीण दरेकर म्हणाले.

संबंधित बातम्या :

जया बच्चन यांचा भाजप खासदार रवी किशनवर अप्रत्यक्ष निशाणा, अभिषेकचे नाव घेत कंगनाचे जहरी ट्वीट

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना रनौत 10 दिवसांसाठी क्वारंटाईन

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी, गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना आदेश

संबंधित व्हिडीओ :

Pravin Darekar criticize Thackeray Government over Kangana Ranaut

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *